ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजनमुंबई

दिशा सालियन कुटुंबाची राष्ट्रपतींकडे धाव

नवी दिल्ली : आरोप-प्रत्यारोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण चर्चेत आहे. आता एक नवीन माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्यावर कारवाई करावी,अशी विनंती दिवंगत दिशा सालियानच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आमच्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण केले जात आहे, असा आरोप देखील दिशाच्या पालकांनी या पत्रात केला आहे.
दरम्यान, २८ वर्षाच्या दिशा सालियानने ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. दिशा बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती. दिशाच्या मृत्यूनंतर ६ दिवसांनी सुशांत सिंग राजपूत बांद्रा येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. दिशाच्या मृत्युमुळे सुशांत सिंगलाही धक्का बसला होता. काही दिवसांनंतर त्याच्याही मृत्यूची बातमी आली. त्यानंतर या प्रकरणात अनेकांची चौकशी करण्यात आली आणि नंतर यात ड्रग्जचा अँगलही समोर आला होता. मात्र दिशा सालियान हिच्या मृत्यूबाबत राणे पिता-पुत्रांनी काही वक्तव्ये केली होती. सुशांतसिंहच्या घरी काहीजण गेले, मंत्र्याची गाडी होती, बाचाबाची झाली आणि…” दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. मात्र दिशाच्या आई-वडिलांनी याचा इन्कार करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नीतेश यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दिशाच्या पालकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे

error: Content is protected !!