आयपीएल क्रिकेटच्या सट्टेबाजीत कुटुंब उध्वस्त
चित्रदुर्ग- सध्या भारतात आयपीएल सुरू आहे आणि आयपीएल मध्ये मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजी होत असते काही वर्षांपूर्वी या सटे बाजीत नऊ क्रिकेटर सामील झाले होते त्यातील काहींना अटक झाली परंतु आजही क्रिकेटमधील बेटीग थांबलेली नाही क्रिकेट बॅटिंग मुळे अनेक जण कर्जबाजारी होऊन आपला जीव गमावतात असाच प्रकार कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याच्या घोष दुर्ग येथे घडला या ठिकाणी दर्शन बाळू नावाच्या एका अभियंता त्याला सट्टेबाजीमुळे बायकोचे प्राण गमवावे लागले तो क्रिकेटच्या सटेबाजीत दीड कोटी रुपये हरला होता हा सगळा पैसा त्याने दुसऱ्याकडून कर्जाऊ घेतला होता त्यामुळे कर्जवाले त्रास देऊ लागताच त्याच्या पत्नीने आत्महत्या केली याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु सट्टेबाजी विरोधात आत्तापर्यंत सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही किंवा सट्टेबाजी बाबत जो कायदा आहे तो कठोर करण्यात आलेला नाही त्यामुळे सटेबाजी आताही सुरूच आहे आणि क्रिकेटचे मोसम कधी संपत संपत नाही कधी कसोटी सामने कधी वडे सामने तर कधी t20 सामने सुरूच असतात आता आयपीएल सुरू असून 22 मार्चपासून सुरू झालेल्या आयपीएल 26 मे पर्यंत म्हणजे जवळपास दीड महिना चालणार आहेत आणि या सामन्यांवर कोट्यावधी रुपयांचा सट्टा लागला आहे परंतु सट्टेबाजांचे पोलिसांशी साठेलोटे असल्यामुळे सट्टेबाजीचा हा बाजार तेजीत आहे. आयपीएल नंतर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप चालू होणार आहे त्यामुळे सट्टेबाजा साठी एक प्रकारे दिवाळीच आहे
तर नागपूर मध्ये या सट्ट्याचे व्यसन एकाच्या जीवावर बेतलं आहे. क्रिकेट सट्टयात हरल्यामुळं प्रचंड आर्थिक फटका बसलेल्या नागपुरातील एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना घडली. नागपूर शहरातील छापरु नगर परिसरातील ही घटना आहे. 20 वर्षीय खितेन वाघवणी असं या तरुणाचं नाव असून मुलानं आत्महत्या केल्याचं कळताच आईनेही आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. या माय लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. खितेन पैशासाठी त्रास देत होते. त्यामुळं खितेन तणावात गेला होता. त्यातूनच त्यानं आत्महत्या केली. हे त्याच्या आईला कळल्यावर आईला प्रचंड मानसिक धक्का बसला आणि आईनेही विषारी रसायन पिऊन आत्महत्या केली.

