केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल- बंगल्याच्या सुशोभीकरनासाठी ४५ कोटी
दिल्ली – अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आणि नंतर आम आदमी पक्ष कडून दिल्लीचे मुख्यमंत्री झालेले अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आणि स्वतः केजरीवाल यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. दारू घोटाळ्यात त्यांचे दोन तुरुंगात आहेत तर केजरीवाल चौकशी सुरु आहे . आणि तेही वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर सुमारे ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ८-८ लाख रुपयांचा पडदा लावण्यात आला आहे. त्याचवेळी मार्बल बसवण्यासाठी १ कोटींहून अधिक खर्च करण्यात आलाय. घरात जे गालिचे टाकले आहेत, त्याची किंमत लाखोंच्या घरात आहे; यावरून आता भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. केजरीवाल यांचा खरा प्रामाणिकपणा आता उघड झाल्याची टीका भाजप नेत्याने केली आहे; करोना साथीच्या काळात बंगल्याच्या सजावटीवर एवढा मोठा निधी का खर्च करण्यात आला, असा प्रश्नही आता राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येतो आहे. त्यावरूनच भाजपनेही आता अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्यातील एका पडद्याची किंमत ८ लाख रुपयांच्या घरात आहे आणि असे २३ पडदे मागवण्यात आले आहेत. १ कोटी १५ लाख किमतीचे मार्बल व्हिएतनाममधून आयात करण्यात आले आहेत, तर ४ कोटी किमतीचे प्री-फॅब्रिकेटेड लाकूड बसवण्यात आलेय. The Indian Express ने मिळवलेल्या PWD दस्तऐवजानुसार, घरातील कामासाठी पहिली मंजुरी १ सप्टेंबर २०२० रोजी मिळाली होती. यामध्ये लायटिंग काम आणि स्वयंचलित फायर अलार्म सिस्टमसह आरसीसी-फ्रेम केलेल्या संरचनेवरच्या कामाचा समावेश होता. दुसरी मंजुरी मे २०२१ मध्ये मॉड्यूलर किचन, लॉन्ड्री आणि पॅन्ट्री इत्यादी बनवण्यासाठी देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दस्तऐवजांमध्ये असलेल्या माहितीनुसार, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग कामांव्यतिरिक्त विविध वॅटेज आणि आकाराचे स्मार्ट लायटिंग फिक्स्चर (२,४४६ फिक्स्चर), ऊर्जा कार्यक्षम पंखे (८० पंखे) आणि डंबवेटर लिफ्ट (जेवण पोहोचवण्यासाठी) एकूण खर्चाचा भाग आहे.