ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

संभाजी राजेंची तलवार म्यान ?


सध्याचं राजकारण हे बेरजेचे आणि विश्वास घाताचे राजकारण आहे. त्यामुळे सतेत आणि सतेच्या अवतीभवती वावरणाऱ्या राजकीय पक्षांवर कुणीही विश्वास ठेऊ नये.संभाजी राजे हे जरी राजघराण्यातील असले तरी त्यांच्याविषयी इथल्या राजकारण्यांना तितकासा आदर नाही.छत्रपतींचे वंशज म्हणून शिवसेनेला संभाजी राजेंच्या विषयी आदर असता तर त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या बदल्यात राजेंनी शिवबंधन बांधण्याची अट घातली नसती.शिवाजी महाराजांचे नाव घेऊन निवडणुका लढवायच्या सता मिळवायची आणि छत्रपातींच्या वारसदारांना काही देण्याची वेळ आल्यावर अटी घालायच्या हा कृतघनपणा आहे.अहो शिवसेनेने शिवबंधन बांधण्याची राजेंना अट घातली मात्र काँग्रेस राष्ट्रवादीकडे राजे गेले असते तर त्यांना इस्लाम कबूल करण्याची अट घालायलाही त्या लोकांनी मागे पुढे पाहिले नसते.कारण सत्ता आणि राजकारण याच्यासाठी काहीही करायची कुठल्याही थराला जायची या लोकांची तयारी आहे .भाजपने ज्याप्रमाणे राजेंना दहा दिला तसाच शिवसेनेने सुधा दगा दिलाय हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या एका महान हिंदू राजच्या वारासदराला दगा देणाऱ्या सेना भाजपचे हिंदुत्व किती तकलादू आहे हेच दिसून येते .अशाच दगाबाज हिंदू मुले या देशावर घुसखोर मुस्लिमांनी आणि 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केले तेंव्हा संभाजी राजेंनी या तोतया हिंदुत्ववाद्यांच्या नादाला लागू नये.त्यांनी ज्या स्वराज्य पक्षाची स्थापना केली आहे त्यालाच मोठे करावे आणि त्याच्या झेंड्याखाली संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र आणावे .

शिवाजी महाराजांविषयी शिवसेनेला आदर असता तर त्यांनी राज्यसभेसाठी विनाअट संभाजीराजेंना तिकीट दिले असते.आणि तेही पहिल्या पसंतीचे संजय राऊत याला काही वर्ष घरी बसवले असते तर काय फरक पडला असता? असेही शिवसेनेसाठी संजय राऊत याचे फार मोठे योगदान नाही.ते शिवसेनेच्या कुठल्या आंदोलनात होते? शिवसेनेसाठी त्यांनी पोलिसांच्या किती आणि कुठे लाठ्या खाल्ल्या आहेत ? किती केसेस अंगावर घेतल्या आहेत? हे एकदा सांगावे. कानामागून येऊन तिखट झालेला हा माणूस आज स्वतःला शिवसेनाप्रमुख समजतोय . त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा याच्यावर राग आहे. संभाजी राजे यांच्या बाबत उद्वव ठाकरे यांची भूमिका सकारात्मक होती पण संजय राऊतने पीन मारली असा उघड आरोप संभाजी राजेंचे समर्थक करीत आहेत तसेच ते संजय राऊत यांना बघून घेऊ असे इशारे देत आहेत.राज्यसभेच्या तिकिटाच्या बदल्यात शिवबंधन बांधण्याची अट घालणाऱ्या शिवसेनेने प्रितिष नंदी,चंद्रिका केनिया याना कसे तिकीट दिले हे सांगावे .असा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय त्याचे उत्तर उद्वव ठाकरेंना द्यावेच लागेल . कारण शिवसेनेमुळे संभाजीराजें राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागत आहे आणि महाराष्ट्रासाठी ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे .

error: Content is protected !!