ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही- तरीही कुणा विषयी आमच्या मनात द्वेष नाही


राज्यसभा निवडणुकीतून संभाजी राजेंची माघार
मुंबई/ शिवसेना,भाजपा आणि राष्ट्रवादी या तिन्ही प्रमुख पक्षांनी दिलेला शब्द फिरवल्यामुळे अखेर काल अपक्ष उमेदवार संभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली .यावेळी त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विषयी नाराजी व्यक्त केली
संभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुकीत सहावा उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी त्यांनी सर्व अपक्ष आमदारांना पत्र लिहिलं होती तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती शरद पवारांनी त्यांना पाठिंबा दिला होता पण नंतर त्यांनी शिवसेनेला पाठींबा दिला तर शिवसेनेने संभाजीराजेंनी निवडणुकीच्या तिकिटाच्या बदल्यात शिवसेनेत प्रवेश करण्याची अट घातली होती ती राजेंनी नामंजूर केली.त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा नाकारला .दरम्यान राज्यसभेच्या मतांची जुळवाजुळव होत नसल्याने अखेर काल संभाजी राजे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि यापुढे स्वराज्य पक्ष वाढवण्यावर भर दिला जाईल असे सांगितले तसेच मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंब्याचे आश्वासन दिले होते ते पाळले नाही असाही आरोप केला आहे .

error: Content is protected !!