ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

आम्ही घरात बसून सरकार चालवत नाही- मुख्यमंत्री शिंदे


कन्नड/ शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत आता लोकांना सरकारकडे जावे लागणार नाही तर सरकारच लोकांपर्यंत पोचणार आहे शिंदे फडणवीस सरकारकडून या योजनेची सुरुवात झाली आहे
शुक्रवारी कन्नड येथे झालेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की आम्ही काम करणारे लोक आहोत घरात बसून सरकार चालवणारे नाही असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला तसेच त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला.प्रसारमाध्यमं बाबत बोलताना ते म्हणाले की माध्यमांनी खरे ते दाखवावे ही गर्दी बघा ही माणसे काही पैसे देवून आणलेली नाहीत सरकार जे निर्णय घेते ते लोकांना कळायला हवेत आम्ही 28 प्रलंबित सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली त्यातून 6 लाख हेक्टर जमीन ओलितखाली येणार आहे जो मागेल त्याला शेततळे दिले जाणार आहे सरकारने दुष्काळग्रस्त अवकाळी pavsat नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली कारण हे सरकार जनतेचे आहे असेही ते म्हणाले

error: Content is protected !!