ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मशिदीवर लावलेल्या भोंग्यांचा वाद – पोलिसांना न्यायालयाने फटकारले

मुंबई – मशिदीवरच्या लाऊडस्पीकरवरून हायकोर्टाने मुंबई पोलिसांना फटकारलं आहे. मशिदीवर लावलेल्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाविरोधात कारवाई न करणे हा न्यायालयाचा अवमान आहे, असं निरिक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे. याबाबत कोर्टाने झोन 12 चे पोलीस उपायुक्त यांना उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
कांनदिवलीच्या लक्ष्मीनगर भागातील गौसिया मशिदीच्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या प्रदुषणासंदर्भात दाखल याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. स्थानिक रहिवासी रिना रिचर्ड यांनी ही याचिका दाखल केली आहे.
ध्वनी प्रदुषणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचं पालन करण्याचे कडक निर्देश हायकोर्टाने पोलिसांना दिले आहेत. तक्रार करूनदेखील पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सुनावणी २९ मे पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
मागच्या वर्षी मशिदींवरच्या भोंग्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मशिदींवरचे भोंगे काढले नाहीत तर हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता, त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं होतं.मात्र आता कारवाई बाबत उच्चं न्यायालयानेच पोलिसांना फटकारले आहे

error: Content is protected !!