ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

मुंबई महापालिकेतील 40 नगरसेवक फुटण्याच्या तयारीत ?


मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे लोन आता महापालिका मध्येही पोचले आहे 14 महापालिकांची मुदत भलेही संपलेली असली तरी या महापालिकांमध्ये गेली 5 वर्ष सक्रिय असलेले जवळपास 400 नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला असून त्यात मुंबईतील 40 नगरसेवकांचा समावेश आहे याचा अर्थ हे 40 माजी नगरसेवक शिवसेनेतून फुटणार असल्याचे समजते
एकनाथ शिंदेंच्या बंडाचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुधा परिणाम होणार आहे मुंबई ठाण्यातील जे आमदार फुटले आहेत त्यांच्या मतदार संघातील सर्व प्रभाग आणि त्यातील नगरसेवक याना आपल्याकडे ओढण्याचे जोरदार प्रयत्न शिंदेंनी सुरू केले आहेत . त्यानुसार ठाण्यातील सर्व शिवसेना नगरसेवक शिंदे सोबत आहेत माजी महपौर आणि जील्ह प्रमुख नरेश म्हस्के यांनी सुधा राजीनामा दिलाय तर मध्य मुंबईतील एक माजी महापौर शिंदे गटाशी संपर्क साधून असल्याचे समजते त्यामुळे शिवसेनेचे नवे गटनेते अजय चौधरी i सावध झाले आहेत.त्यांनी बारीक लक्ष आपल्या मतदार संघातील नगरसेवकांवर ठेवला आहे .

निष्ठावंतांना डावलल्याचे परिणाम
राजकारण आणि खंजीर यांचं खूप जवळच नात आहे.कारण एखाद्या नेत्याने मेहनत करून पक्ष उभा करायचा रात्रीचा दिवस करून निवडणुकी मध्ये आपल्या पक्षाच्या लोकांना निवडून आणण्यासाठी सभा मेळावे घ्यायचे आणि निवडून आल्यावर त्यांनी पक्षाशी गद्दारी करायची हे कुठे तरी थांबावे असे वाटत असेल तर निवडणुकीचे तिकीट देतानाच खबरदारी घेण्याची वेळ आली आहे.आज कोणतीही पात्रता नसलेल्या एकनाथ शिंदेंनी बंड केले आणि 41 आमदार फोडले.पण या बंडात सामील असलेले एकनाथ शिंदे यांच्यासह एका तरी आमदाराची स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून येण्याची लायकी आहे का? बाळासाहेब आणि शिवसेनेच्या नावावर हे लोक निवडून आले आणि आज ज्या भाजपने शिवसेना संपवण्याची योजना आखली आहे त्यांच्याच गोटात शिरण्याचा प्रयत्न चालवला आहे.पण याला काही अंशी शिवसेना नेतृत्व सुधा जबाबदार आहे कारण शिवसेनेत जे खरेखुरे निष्ठावान आहेत अशा लोकांना डावलून जे एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेऊन उभे आहेत अशा लोकांना निवडणुकीचे तिकीट दिले गेले त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी मेहनत केली आणि तेच लोक आता शिंदेच्या बंडात सामील झालेत याचे जिवंत उदाहरण म्हणजे माहीम मतदार संघातील शिवसेनेचा आमदार सदा सरवणकर! या सदाची मनोहर जोशींनी तिकीट कापली म्हणून त्यांच्या घरावर हल्ला झाला तो यानेच करायला लावला अशी शिवसेनेत चर्चा होती त्यानंतर याने नारायण राणेशी संशन साधून काँग्रेस मध्ये गेला राणेंनी साधला विधानसभेचे तिकीट मिळवून दिले पण त्यावेळेला मनसेचे नितीन सरदेसाई आले आणि सदा पडला असे असताना या सदला नंतर स्वता उधव ठाकरे यांनी वाजत गाजत शिवसेनेत आणले 2014 चां निवडणुकीत विधानसभेचे तिकीट दिलं त्याच्यासाठी शिवसैनिकांनी मेहनत घेऊन त्याला निवडून आणले सदा विभाग प्रमुख होता पण संघटना मजबूत करण्या ऐवजी शिवसेना आणि उधव ठाकरेंचे उपकार विसरून त्याने टीवेलेस काँग्रेस मध्ये असलेले कालिदास कोळंबकर यांच्याशी संधान बांधून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला नायगाव खिळखिळा करून टाकला पण पक्ष नेतृत्वाने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे कोळंबकर आणि सदा यांची युती झाली आणि शिवसेना विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली या पराभवाची खरे तर पक्ष नेतृत्वाने समीक्षा करून सदाला त्याच वेळी शिवसेनेतून हक्लयला हवे होते पण मातोश्रीवर जे udhav ठाकरे यांचे सल्लागार आहेत त्यांचे आणि सदाचे आर्थिक लागेबांधे असल्याची आजही शिवसेनेत चर्चा आहे आणि त्याच लोकांनी सदाला वाचवले सदाच्या काळा कांडीची माहिती पक्ष प्रमुखांच्या पर्यंत पोचू दिली नाही त्यामुळे याच संधीचा फायदा घेऊन सदने त्याच्या मुलाला 2017 च्या पालिका निवडणुकीचे तिकीट देऊन निवडून आणले

error: Content is protected !!