ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

उल्हासनगर ची कायदा सुव्यवस्था बिघडली. पोलिस यंत्रणा सपशेल फेल

.

एका हप्त्यात दोन हत्या .
उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था एकदम ढासळली आहे . एका आठवड्यात दोन हत्या झाल्या आहेत .कँप 5 येथे तर एका गर्दुल्याने केवळ 20 रुपये दिले नाही म्हणुन हत्या केली आहे . तर एका दारुड्या भावाने घराच्या वाटणीवरुन मोठ्या भावाची हत्या केली आहे . दरम्यान एका अल्पवयीन गर्दुल्याने अल्पवयीन मुलीवर ब्लेड ने सपासप वार केले आहेत . त्यामुळे गुन्हेगारावर पोलिसांचा अंकुश राहीला नाही . म्हणुन गुन्हेगार मोठ्या प्रमाणात निर्ढावले आहेत . शहरात जुगार मटक्याचे धंदे जोरात सुरु आहेत . गांजा विक्री सुध्दा जोरात सुरु आहे . पोलिस यांच्या कडुन हप्ते वसुल करत असल्याने हे धंदे बिनधास्त पणे सुरु आहेत . त्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे . उल्हासनगर शहरात एका आठवड्यात दोन हत्या झाल्या आहेत . तर एका अल्पवयीन मुलीवर गर्दुल्याने वार केल्याची घटना रात्री उशीरा घडली आहे .पोलिस यंत्रणा पुर्णता फेल झाली आहे . उल्हासनगर कँप 5 येथिल जय जनता कॉलनीत राहणार्‍या अनिल आहुजा (20) याने साहील मैराळे या गर्दुल्याला केवळ 20 रुपये दिले नाही म्हणुन त्याने अनिल ची चाकुने वार करुन हत्या केली . तर कँप 1 येथिल भिमनगर परिसरात सख्या संतोष कदम नावाच्या लहान दारुड्या भावाने मोठा भाऊ विठ्ठल कदम याची घराच्या वाटणी वरुन हत्या केली आहे . तर या दोन्ही हत्येतील आरोपी अटक आहेत . दरम्यान शक्ती सदन इमारती जवळील महानगरपालिकेच्या बाल उद्यानात गुरुवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली आहे ,एका अल्पवयीन गर्दुल्याने एका अल्पवयीन मुलीवर ब्लेडने सपासप वार करून गंभीर जखमी केले आहे . या मुलीच्या नाकावर . हातावर . छातीवर आणि तोंडावर गर्दुल्याने सपासप वार करून घटनास्थळावरून त्याने पळ काढला आहे. दरम्यान स्थानिकांनी रक्तबंबाळ झालेल्या मुलीला पाहून तिला मध्यवर्ती रुग्णालयात उपचार्थ दाखल केले . मात्र मुलीला गंभीर जखमा असल्याने प्राथमिक उपचार करून तिला रात्री उशिरा ठाणे येथील शिवाजी महाराज रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. सदर मुलगी ही आई वडील नसल्याने उल्हासनगर मधील चोपडा कोर्ट परिसरात नातेवाईकाकडे राहत असून घटनास्थळी ही मुलगी का आणि कशासाठी गेली होती हे अनुत्तरित आहे . उल्हासनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उल्हासनगर पोलीसानी त्या गर्दुल्याचा शोध घेत त्याला अटक केली असुन तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला भिवंडी येथिल रिमांड होम मध्ये पाठवले आहे . दरम्यान एका आठवड्यात दोन हत्या तर एका अल्पवयीन मुलीवर ब्लेड ने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना हे पोलिस यंत्रणेचे अपयश आहे . अशी चर्चा होत आहे . उल्हासनगर मध्ये एका आठवड्यात दोन हत्या होतात तर येथे गुन्हेगारीला फार उत आला असुन शहरातील प्रत्येक कँप मध्ये राहणारे महिला पुरुष लहान बालके सुखरुप नाहीत .

error: Content is protected !!