ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

कर्मयोगी-स्वर्गीय नाथा गोविंद जाधव यांची जीवन गाथा पुस्तकाचे

आमदार शिवाजीराव नाईकसाहेब यांचे शुभहस्ते प्रकाशन
शिराळा तालुक्यातील मौजे टाकवे गावचे थोर विचारवंत व समाजसेवक स्वर्गीय नाथा गोविंद जाधव यांची जीवन गाथा कर्मयोगी या नावाने शनिवारी दिनांक 9-2-2019 रोजी प्रसिद्ध झाली
शिराळा तालुक्याचे विद्यमान माननीय आमदार शिवाजीराव नाईकसाहेब माजी बांधकाम राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते टाकवे हायस्कूलच्या भव्य मैदानावर थाटामाटात प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होत या कार्यक्रमाचे अध्यक्ष हणमंत जाधव होते या कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण किसनराव जाधव कर्मयोगी या पुस्तकाचे प्रकाशक व मुंबई जनसत्ता साप्ताहिकाचे संपादक यांनी केले. टाकवे गावचे सरपंच सुर्यकांत रावते यांनी प्रस्तावीक भाषण करून स्वर्गीय नाथा जाधव यांचा अल्प परिचय करून दिला.
टाकवे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एम.के.खोत व किसन रावते यांनीही मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष हणमंत जाधव यांचे भाषण झाले. त्यानंतर आमदार शिवाजीराव नाईक यांनी स्वर्गीय नाथा जाधव याचे जीवनावर सविस्तर मनोगत व्यक्त करून उत्तर शिराळा तालुका विकास टाकवे येथे प्राथमिक रुग्णालयाचे थोडया दिवसात बांधकाम सुरू होत असल्याचे जाहीर केले
या कर्मयोगी पुस्तकाचे लेखक नाटककार सुरेश जाधव यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली तर कॅमेरामन दादांसाहेब जाधव, उद्योजक अशोक जाधव, समाजसेवक बाळकृष्ण जाधव, मयुरेश जाधव यांच्या हस्ते आलेल्या पाहुण्यांणा शाल श्रीपळ देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सुनील जाधव बिल्डर (पुणे). बी.जी कदमसर, एम टी घागरेसर, डॉ.एम.सी.पाटील, पैलवान आनंदराव धुमाळ , टाकवे गावचे पोलीस पाटील विनोद सुतार, सोसायटी चेअरमन संजयराव ठोंबरे ,समाजसेवक दिनेश यवतकर, मौेजे टाकवे ग्राम विकास मंडळ मुंबईचे पदाधिकारी- शंकरराव बोबडे,पांडूरंग माने, हेमंत जाधव, मोहन रावते, उपसरपंच महावीर पाटील ,सदस्य विलास गुरव, राजेंद्र कुंभार, विजय रावते, भैरववाडी सरपंच विलास येळवे, शिवाजी आनंदा पाटील ,आंनदराव यवतकर,भगवान कराळे, नाट्यकलाकार रजाक मुल्ला, दिलीप वीर तसेच बाबवडे, पाचुंब्री भैरेवाडी,शिवरवाडी, घागरेवाडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
टाकवे हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्तात्रय खाडेसर ,सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग, हायस्कूलच्या आजी व माजी विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

error: Content is protected !!