ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिका

झोपडीदादाचे षडयंत्र हाणून पाडा-

मुंबई(प्रतिनिधी) तत्कालीन सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांनीही अशीच कार्रवाई सरदार वल्लभ भाई पटेल रोडवरील अनधिकृत झोपडया तोड़त पालिकेचा दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या निवृत्ती नंतर आता त्याच ठिकाणी झोपडया पुन्हा उभ्या राहिलेल्या आहेत. तेथील झोपडीदादा दलालाची नंबर टाकण्यासाठी पालिका खात्यात प्रयत्न चालू केला आहे. त्यासाठी राजकिय पाठबळ वापरण्यासाठी खेळी खेळली जात आहे. आताचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले, विशाल म्हैसकर,उप अभियंता रामटेके यांनी झोपडीदादाचे षडयंत्र हाणून पाडून कारवाईचे धाडस दाखवतील का? असा प्रश्‍न विभागात विचारला जात आहे.
नगरसेवक आणि आमदार जबाबदार प्रतिनिधीचे दुर्लक्ष?
बी प्रभागातील पदपथावरील झोपडीदादाचे षडयंत्र पोलिसांनी उघडकीस आणून काही दलाल गजाआड केले परतु याची व्याप्ती प्रंचड आहे. झोपडीदादाचे षडयंत्र रोखण्यासाठी पालिकेला राजकीय पाठबळाची गरज आहे. जबाबदार लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष या प्रश्‍नाकडे होत असल्याने झोपडीदादाचे मनोबल वाढले असून सरास पदपथ अतिक्रमणित करून मोफत घरे पदरात पाडूण घेण्यासाठी चुरस लागली आहे.

error: Content is protected !!