ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
राजकीय

स्वतःच्या खिशात हात घालून कधीतरी उभे रहा मुंबईकरांसाठी-

मुंबई (बापू जाधव ) आज विज्ञान युगातील माणसाला काहीही अशक्य नाही त्यामुळे करोना संकटातून लोकांना वाचवणे कठीण आहे असे कुणीही समजू नये कारण इस्त्राईल करोना मुक्त झालाय अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ब्राझील, इटली, आणि तमाम पाश्‍चित्य देशांनी करोनावर नियंत्रण मिळवले आहे पण 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात मात्र करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय उपचारांची साधने कमी पडत आहेत त्यामुळे रोज हजारो लोक मारत आहेत तर संपूर्ण देशात रोज साडेतीन लाख लोक करोनाबाधित होत आहेत या करोना बाधितांना रूग्नालयात मध्ये बेड मिळत नाहीत आक्सीजन मिळत नाही औषधे पुरेशी मिळत नाहीत आणि याला जबाबदार आहेत इथले राजकारणी करोनाचा संकट काळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापले राजकारण बाजूला ठेऊन लोकांचा जीव वाचवण्यासाठी एकत्र येवून काम करायला हवे प्रशासनाकडून व्यवस्थित काम होतेय की नाही यावर नझर ठेवायला हवी पण तसे करण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधक आपल्या स्वार्थी राजकारणासाठी एकमेकांच्या पायात पाय अडकवून परस्परांची उनिधुनी काढीत आहेत आणि त्यांच्या याच घाणेरड्या राजकारणामुळे या देशात करोनाबाधितांची संख्याणिक मृत्यू दर वाढतोय
केंद्रात भाजपचे सरकार आहे तर महाराष्ट्रात तीन पक्षांच्या महा विकास आघाडीचे सरकार आहे मात्र दोन्ही सरकार मध्ये समन्वयाचा अभाव आहे महाराष्ट्राला पुरेसा लसीचा साठा दिला जात नाही ऑक्सिजन दिला जात नाही असा आरोप इथल्या सरकार मधील मंत्री करीत आहेत तर केंद्र सरकारने सर्वाधिक मदत महाराष्ट्राला दिली आहे असा इथल्या भाजप वाल्यांचा दावा आहे आणि हे राजकारणी पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांच्या विरोधात चिखलफेक करीत आहेत आणि या राजकारणात त्यांचा प्रशासनाकडे लक्षच राहिलेला नाही त्यामुळे प्रशासनाची मनमानी सुरू आहे कुठल्याही जिल्ह्यात तिथले जिल्हा प्रशासन कधीही कुणालाही विचारात न घेता कितीही दिवसांचा लॉक डाऊन लावून लोकांची गैरसोय करीत आहेत पण तिथले जे राजकीय पक्षाचे लोक आहेत ते याबाबत प्रशासनाला जाब विचारायला तयार नाहीत खाजगी रूग्नालयात मनमानी सुरू आहे पण राजकीय पुढारी तिथेही लक्ष द्यायला तयार नाहीत संपूर्ण महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी रूग्नालयामध्ये 80 टक्के बेड कोवीड पेशंटसाठी आहेत शिवाय वेगवेगळ्या ठिकाणच्या मोकळ्या जागेत कोवीड सेंटर उभारण्यात आलीत पण तिथली काय अवस्था आहे हे कधीही तिथल्या स्थानिक लोप्रतिनिधींनी पाहिलेले नाही त्यामुळे कोवीड रुग्णालयांमध्ये कुठे गॅस गळती तर कुठे आगीच्या दुर्घटना घडत आहेत आणि त्यात आजवर शेकडो लोकांचा बाली गेलाय त्यामुळे संकटकाळात या राजकारण्यांच्या शह कट शहामुळेच इथे करोना बळावतोय इतर देशांमध्ये तसे नाही कारण तिथल्या सर्वपक्षीय राजकारण्यांनी आपल सर्व लक्ष देशाला करोना मुक्ती करण्याकडे वळवले आहे सरकार आणि विरोधी पक्ष तिथे हातात हात घालून काम करतोय म्हणून तिथे करोना आटोक्यात आहे त्यामुळे तिथल्या राजकरण्यांकडून इथल्या राजकारण्यांनी धडा घ्यायला हवा
चमकेश पण कंजूस आणि बेफिकीर लोक प्रतिनिधी
महाराष्ट्रात 288 आमदार 48खासदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हजारो नगरसेवक आहेत करोना रोखण्यासाठी लॉक डाऊन लावा लॉक डाऊन लावा अशी मागणी करायला ते पुढे पुढे असतात पण लॉक डाऊनच्या काळात ज्यांचा रोजगार गेलाय ज्यांच्यावर उपाशी करायची पाळी आलीय अशांना स्वतःच्या खिशातून चार पैसे मदत करायची त्यांची दानत नाही उलट सामाजिक संघटनांनी पैसे गोळा करून गरिबांसाठी आयोजित केलेल्या अन्नदान कार्यक्रमाला मात्र ते आवर्जून हजर असतात जणू काही त्यांच्याच पैशातून तो कार्यक्रम आयोजित केलाय दश्रिन मध्य मुंबईत गुपच्या वतीने अनेक ठिकाणी अन्नदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याच योजनेअंतर्गत शिवडीत आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मुंबईचे खासदार हजर होते वास्तविक हे लोकप्रतिनिधी असल्याने लॉक डाऊन च्या काळात त्यांनी स्वतःच्या खर्चाने असेल कार्यक्रम आयोजित करायला हवे होते पण दुसर्‍याच्या कार्यक्रमात श्रेय घेण्याची संधी कुठे हुक्ता नये म्हणून नाही तर इतर पक्षाचे नेतेही अशा कार्यक्रमांना हजार राहण्याची संधी सोडत नाहीत अरे पण स्वतःच्या खिशातले पैसे काढून लोकांना संकटात मदत कराणां. आज सगळे लोकप्रतिनिधी करोडपती आहेत पण जनतेच्या मतावर निवडून आलेले हे लोक जनता संकटात असताना लोकांना मदत करायला तयार नाहीत तेंव्हा आता लोकानीच यांचे काय करायचे ते ठरवावे

error: Content is protected !!