ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

दादर स्टेशन परिसरातील फेरीवाल्याकडून हप्ते वसूल करणार्‍या बबलूचा टोळीला रेल्वे पोलिसांकडून अटक

पालिका अधिकारी संशयाच्या भोवर्‍यात
मुंबई (प्रतिनिधी) पोटासाठी फुटपाथवर बसून लोकांच्या गरजेचे सामान विकणारे फेरीवाले हे गरीब कुटुंबातील असतात त्यातच शिक्षण घेऊनही नोकर्‍या मिळत नसल्याने काही बेरोजगार तरुणही फेरीवाले बनले आहेत आणि अशा लोकांकडून काही गुंड टोळ्या हप्ते वसूल करतात विशेष म्हणजे या खडणीखोरांना स्थानिक पोलीस आणि पालिका अधिकार्‍यांचा सुधा छुपा पाठिंबा असतो कारण तेही या हप्तेवसुलीत भागीदार असतात शिवाय या टोळ्यांना राजकीय पक्षांचा सुधा आशीर्वाद असतो त्यामुळे गरीब फेरीवाल्यांचे आर्थिक शोषण होते. दादर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्याकडून हप्ता वसूल करणार्‍या कुख्यात गुंड बबलू ठाकूर याला त्याच्या साथीदारांसह रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आता बब्लूच्या या खंडणी रॅकेट मध्ये सामील असलेल्या पालिका अधिकारी आणि स्थानिक फंटर जमालची सुधा चौकशी करावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी आणि काही फेरीवाल्यांनी केली आहे
दादर मुंबईतील एक मोठी बाजारपेठ असून ती नेहमी गजबजलेला असते त्यामुळे येथील स्टेशन परिसरात जितकी दुकाने आहेत त्याच्या दुप्पट तिप्पट फेरीवाले आहेत आणि त्यांच्याकडून या भागातले गुंड हप्ते वसूल करीत असतात. या हप्तेखोरा विरुद्धचा तक्रारींची सहसा पोलीस दाखल घेत नाहीत कारण या हप्तेखोरीत त्यांचाही वाटा असतो शिवाय फेरीवाले बेकायदेशीरपणे फुटपाथवर धंदा करीत असतात त्यामुळे रहदारीला आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तरीही पालिका अधिकारी फेरीवाल्यांवर सहसा कारवाई करीत नाहीत कारण त्यांनाही हप्ता चालू असतो असा इकडच्या लोकांचं आरोप आहे. पूर्वी इथल्या फेरीवाल्याकडून नाईक टोळी हप्ता वसूल करायची तशी पोलिसांच्या रेकार्डला नोंदही आहे . पण आता इथे बबलू ठाकूर सारख्या परप्रांतीय गुंडांनी बस्तान बसवले आहे . बब्लूनी या हप्ते वासुलीतून अफाट पैसा कमावला असून या पैशातून त्याच्या पत्नीने 9 घरे आणि लाखोंचे दागदागिने बनवले आहेत. दादर हा मराठी माणसाचा बालेकिल्ला पण तो आज बबलू सारख्या परप्रांतीय गुंडांच्या हातात आहे आणि आमचे मराठी राज्यकर्ते,पोलीस आणि पालिका अधिकारी जणू काही बबलूच्या खिशात आहेत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे बबलू एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या साथीदारांना एका राजकीय पक्षाची लेटरहेड मिळाली त्यामुळे रेल्वे पोलीस कदाचित दबावाखाली बबलू टोळीवर कठोर कारवाई करणार नाहीत काहीतरी थरूर मातुर कारवाई करून त्याला सोडविण्याचा प्रयत्न होईल. त्यानंतर पुन्हा त्याची हप्ते वसुली सुरू होईल आणि यात बिचारे गरीब फेरीवाले मरतील म्हणूनच बब्लुला सपोर्ट करणारे व त्याच्या हप्ते वसुलीत भागीदार असलेल्या स्थानिक पालिका कार्यालय (जी-नार्थ) अधिकार्‍यांची चौकशी व्हायलाच हवी कारण त्यांच्यावर कारवाई झाली तर ते बबलू सारख्या गुंडाला पाठीशी घालणार नाहीत परिणामी बब्लुच्या हप्ता वसुलीच्या धंद्याला लगाम बसेल आणि फेरीवाल्यांना मोकळा श्‍वास घेता येईल
खाससूत्रानी दिलेल्या माहीतीनुसार या बबलूच्या बरोबर आणखी एक फंटर जमाल आणि दिनेश नावाची चर्चा झडत आहे. या तिघाचा संबध काय? जी-नार्थ पालिका विभागातील दादर ,माहीम,टिळक ब्रिज खालील भाजीपाला पदपथ फेरीवाले, भाजीचे टॄक, दादर स्टेशन लगत फेरीवाले यांच्याकडून हप्ते गोळा केले जात होते. ते कोणाच्या खिशात गेले याचा शोध बबलूकडून पोलिसांना घ्यायाचा हवा. यांनाही चौकशीच्या फेर्‍यात उभे करायला हवे. तरच न्याय होईल.
सध्या मुंबईतील मराठी माणसांचे जे तारणहार आहेत त्यांनी बबलू सारख्या वसूली गुंडाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न केल्यास मराठी माणसाला संधी मिळेल. रेल्वे पोलिसांनी बबलूला अटक करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

error: Content is protected !!