दादर उड्डाण पुलाखाली बनवलेल्या पालिकेच्या उद्यानाचे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
गार्डन सेल विभागाच्या अधिकार्यांची दिवसरात्र मेहनत फळाला
मुंबई (किसन जाधव) महानगरी मुंबई मध्ये इतक्या झोपडपट्ट्या आणि सिमेंटचे जंगल आहे की की मुंबईकरांचा श्वास गुदमरतो आहे अशावेळी दिवसभर कमधांद्यावरून दमून आल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी दोन घटका निवांत घालवता येतील अशी जागाही उपलब्ध नाही .मुंबईकरांची ही अडचण लक्षात घेऊन तसेच मुंबईला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेने पालिका प्रशासनाच्या मदतीने मुंबईत जी काही उपलब्ध जागा आहे. तेथे उद्याने बनवली आहेत. अशापैकिच एक असलेल्या दादरच्या उड्डाण पुलाखालील उद्यानाचे नुकतेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले साडेसात कोटी रुपये खर्चून दहा हजार चौरस मीटरचा जागेवर बांधलेल्या या उद्यानाचे आठ भाग असून याठिकाणी सुंदर आणि हिरव्यागार वेली फुले आणि मनमोहक हिरवळ असे मन प्रसन्न करणारे वातावरण तयार करण्यात आले आहे. येथे नागरिकांना खास करून जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेचेस, मुलाना खेळण्यासाठी विविध सुविधा, योगासाठी सुविधांसह विविध सुविधांनी संपन्न असलेल्या या उद्यानाचे काम केवळ सव्वा वर्षात मानसी कन्स्ट्रक्शनने केले. त्यासाठी पालिकेच्या गार्डन विभागाचे उपायुक्त रमाकांत बिराजदार यांनी दिवस रात्र जातीने लक्ष घालून त्यांचे सहकारी गार्डन सेल विभागाचे कार्यकारी अभिंयता शशिकांत बेबंडे (स्थापत्य) , कार्यकारी अभियंता सतीश जाधव (विद्युत) व अन्य सहायक अभिंयता पाटील आणि परवडे अभियंते यांना बरोबर घेऊन हे काम वेळेवर पूर्ण केले. पालिका प्रशासनातील अधिकारी व अभियंते कशा प्रकारे एखाद्या प्रकल्पावर जीव तोडून मेहनत घेतात हे या उद्यानाच्या निमित्ताने दाखवून दिले. त्यांना सहाय्यक आयुक्त संपदा क्षीरसागर आणि सहायक आयुक्त बल्लाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या लोकार्पण सोहळ्याला आदित्य ठाकरे यांच्यासह महापौर किशोरी पेडणेकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, शिवसेना नगरसेविका उर्मिला पांचाळ तसेच शिवसेनेचे व युवासेनेचे पदाधिकारी आणि पालिका अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते