महाराष्ट्राची दुर्दशा
कधीकाळी मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईची शान होता तर मुंबईची चाळ संस्कृती ही मराठी माणसाच्या धार्मिक आणि सामाजिक अस्मितेची ओळख होती या सारखे सन मुंबईत मोठ्या उत्साहात साजरे केले जायचे पण काळाच्या ओघात तो सर्व आनंद तो सर्व उत्साह कुठल्या कुठे गडप झाला कारण गिरणी कामगारांच्या संपात मुंबईतील संपूर्ण गिरणगाव आणि इथला मराठी माणूस पूर्णपणे उध्वस्त झाला गिरण्या बंद पडल्याने मुंबईतील घरदार विकून लोक गावी गेले तर काहींनी मुंबईच्या बाहेर जाणे पसंत केले पण मुंबईतून मराठी माणूस परागंदा होत असताना कुठल्याही राजकीय पक्षाने त्याला मदतीचा हात दिला नाही ही आहे मुंबईतील मराठी माणसाची शोकांतिका आज महाराष्ट्राच्या या राजधानीत मराठी माणूस आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय कारण त्याने लढून मिळवलेली मुंबई त्याच्या हातून कधीच गेली मुंबईत मराठी माणूस केवळ इतिहासाच्या पानावराच दिसणार आहे .उर्वरित महाराष्ट्राची सुधा हीच स्थिती आहे निसर्गाचा प्रकोप आणि सरकारची अनास्था यामुळे बळीराजा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतोय गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातील 42हजार कर्जबाजारी शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत ग्रामीण भागात शेतीला पर्यायी व्यवस्थाच नसल्याने शेतकरी हवालदिल झालंय गेल्या साठ वर्षांत येथे वेगवेगळ्या पक्षांची सरकारे आली यशवंतराव चव्हाण,वसंतराव नाईक शरद पवार यांच्या सारखे कर्तबगार नेते मुख्यमंत्री झाले पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे पुरेसे औद्योगीकरण झाले नाही किंवा शेती व्यवसायातही काही अमुलाग्र बदल झाले नाही त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकला नाही परिणामी फक्त आणि फक्त शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी कर्जाच्या दुष्ट चक्रातून बाहेर रिवर्ही शकला नाही दुष्काळ,अतिवृष्टी,गारपीट यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत असताना नेते मंडळी मात्र रिकाम्या हाताने शेताच्या बांधावर फेरफटका मारायला जाताना दिसत होती पण यावेळी शेतकर्याच्या मुलाला दोन रुपयाचे चने शेंगदाणे देण्याचे सुधा त्यांनी औदार्य दाखवले नाही की आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या कुटुंबीयांची विचारपूस करायला जाताना शेतकर्याच्या विधवा पत्नीला शे दोनशे रुपयांची कुणी दिली नाही आणि अशा पुढार्यांच्या हाती आमचा महाराष्ट्र आहे साठ वर्षांच्या नंतरही मागे वळून पाहिल्यावर जर अंधार दिसत असेल तर राज्यकर्त्यांनी इतकी वर्ष काय केलं आणि कुठे नेवून ठेवला माझा महाराष्टॄ असा प्रश्न आज लोक विचारात आहेत एक मे म्हणजेच महाराष्ट्र दीन! या दिनाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे हा दिवस कामगार दीन म्हणूनही साजरा केला जातो पण आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील कामगारांची दुर्दशा पाहिल्यावर खरोखरच हा दिवस साजरा करण्याची नैतिकता आमच्यात आणि खास करून इथल्या राजकारण्यांमध्ये उरली आहे का हाच खरा प्रश्न आहे.मूठभर मावळ्यांना सोबत घेवून बलाढ्य आदिलशाही, निजामशाही आणि मोगलांशी संघर्ष करून स्वराज्याचे तोरण बांधणार्या शिवप्रभुवचा हा महाराष्ट्र ! वर्ण व्यवस्थेवर घाला घालून एका मोठ्या उपेक्षित समाजाला त्याचा न्याय हक्क मिळवून देवून त्याला देशाच्या मुळ प्रवाहात आणणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज ,ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या थोर समाज सुधाकराचां हा महाराष्ट्र आज कुठे आणि कसा असायला हवा होता कला, क्रीडा, संस्कृती, शौर्य, प्रतिभा,आदी ज्ञरीहररींहळ महाराष्ट्र मागे नव्हता आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या देशातील सर्वाधिक प्रगात राज्य अशी महाराष्ट्राची ख्याती होती पण दुर्दैवाने आज महाराष्ट्राची ही ओळख पुसली गेलीय कारण इथल्या राजकारण्यांनी स्वतःच्या शुल्लक स्वार्थासाठी महाराष्ट्राला विकून खायचे बाकी ठेवले आहे .आज महाराष्ट्रावर सहा लाख कोटींचे कर्ज आहे हे कर्ज कोणी कशासाठी घेतले त्यातून महाराष्ट्राचा किती विकास झाला किती प्रकल्प उभे राहिले किती लोकांना रोजगार मिळाला या बद्दल राज्यातील जनतेला काहीच ठावूक नाही मात्र हे कर्ज जनतेने फेडायचे आहे.अशी अवस्था आहे या महाराष्ट्राची संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 105हुतात्म्यांनी प्राणाची आहुती देऊन मुंबईसह महाराष्ट्र मिळवला.मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली तर महाराष्ट्राची राजधानी झाली पण या राजधानीची आज धर्मशाळा झाली आहे देशाच्या काना कोपर्यातून कुणीही येतो कुठेही तंबू ठोकतो मिळेल त्या मोकळ्या जागेवर पथारी पसरतो त्यामुळे मुंबईत ना फुटपाथ शिल्लक राहिली आहे ना खेळाची मैदाने! पण कुणालाच त्याचे काही सोयर सुतक नाही मुंबई प्रमाणेच महाराष्ट्रातील इतर शहरांची सुधा तशीच स्थिती आहेत शहरांचे औद्योगीकरण होत असल्याने शहरे कशीही वेडी वाकडी वाढत चालली आहेत आणि या वाढत चाललेल्या शहरांना नागरी सुविधा पुरवताना तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाकी दम येतोय.खरे तर उद्योग धंद्यासाठी महाराष्ट्र एक सुरक्षित राज्य होते पण आज नवीन उद्योग येण्याचे सोडाच इथे असलेले उद्योग धंदे सुधा दुसर्या राज्यात जात आहेत त्यामुळे इथल्या स्थानिक जनतेवर बेरोजगार होण्याची पाळी आलीय.आज कामगार दीन पण कामगारांची काय अवस्था आहे