ऑन लाईन नोंदणीची दंडेली केल्यामुळे मुंबईकरांमध्ये संतापाची लाट
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई शहर करोना मोठा हॉट स्पॉट बनलेले असताना मुंबई महानगर पालिकेच्या लसीकरण मोहिमेचा अक्षरशः फज्जा उडाला आहे एकीकडे लसीचा तुटवडा तर दुसरीकडे लसिकरणासाठी जी ऑन लाईन नोंदणीची सक्ती करण्यात आलेली आहे त्या शक्तीमुळे लोक हैराण झालेत कारण ऑन लाईन नोंदणी करूनही अनेकांना मॅसेज च आलेला नसल्याने अनेकांना लसीकरण केंद्रावरून निराश होऊन परत जावे लागत आहे आणि असे असतानाही पालिकेने ऑन लाईन नोंदणीची दंडेली केल्यामुळे मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहेवपलिकेच्या सदोष ऑन लाईन प्रक्रियेमुळे हजारो मुंबईकरांना लस घेता आली नाही कित्येकांना पहिला डोस सुधा मिळाला नसल्याचे उघडकीस आले आहे
करोनाला प्रतिबंध करण्यासाठी लस हाच एक मोठा उपाय आहे कारण याच लासिकरणामुळे इस्त्राईल सारखा देश कोरोणामुक्त झाला तर इतर देशांमध्ये सुधा करोना आटोक्यात आला आहे त्यामुळेच भारत सरकारने लसिकरणावर जोर दिलंय 18ते 45 वयोगटातील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे त्यासाठी देशी विदेशी कंपन्यांकडून लसीचा मुबलक साठा उपलब्ध करण्याची प्रक्रिया केंद्र सरकार कडून सुरू आहे त्याच बरोबर लसी साठी लागणारा कच्चा माल देण्याची तयारी अमेरिकेने दर्शवल्याने लस बनवण्याची प्रक्रिया वेगाने होणार आहे पण भारतात मात्र लसीचे राजकारण सुरू आहे लसीच्या तुठवड्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवत आहेत आणि यात लस घेण्यास उत्सुक असलेल्या लोकांचे हाल होत आहेत मुंबई महानगर पालिकेने कालच एक फर्मान काढले आहे की लसीची नोंदणी ही ऑन लाईन पद्धतीनेच होणार आणि ज्यांनी ऑन लाईन पद्धतीने नोंदणी केली नसेल व तसा मॅसेज त्यांना आला नसेल त्यांना लस मिळणार नाही पण ज्यांनी ऑन लाईन नोंदणी केलीय त्यापैकी अनेकांना मासेजाच आले नाहीत त्यामुळे त्यांना लस मिळू शकली नाही याचा अर्थ पालिकेची यंत्रणाच सदोष आहेत आणि तसे असेल तर ऑन लाईन नोंदणीची सक्ती पालिकेने मागे घ्यावी अशी मागणी मुंबईकर करीत आहेत