राज्य सरकार पूरग्रस्तांना मदत जाहीर करणार केंद्राकडून 700 कोटींची मदत
दौर्याचे राजकारण सुरू
मुंबई/ महाराष्ट्रातील पूरस्थिती अत्यंत गंभीर असल्याने केंद्र सरकारं महाराष्ट्राला 700 कोटींची मदत करणार आहे असे काल कृषिमंत्री नरेद्रसिंग तोमर यानी लोकसभेत सांगितले तर राज्य सरकार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांना मदत जाहीर करणार आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष या मदातिकडे लागले आहे
महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती आता हळू हळू नियंत्रणात येत आहे कारण पावसाचा जोर काहीसा कमी झालंय मात्र पावसाचे पाणी सर्वत्र तुंबल्याने जो चिखल झालाय तो उपसण्याचे काम आता सुरू आहे . या चीखलामुळे रोग राईचे संकट घोघावत आहे .दरम्यान काल राज्यपाल कोशारी यांनी त्याली गावाला भेट देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली. याच गावात भूसलनन होऊन जवळपास 75 लोकांचा मृत्यू झाला असून फक्त 44जणांचे मृतदेह सापडले आहेत.काल राज्यपालांनी एन डी आर एफ क्या अधिकार्यांशी तसेच गावकर्यांशी चर्चा करून तिथली परिस्थिती पाहून घेतली तसेच राज्यपालांनी पूरग्रस्त चिपळूण शहराची सुधा पाहणी केली तर उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली सातारा भागातील पूर स्थितीची पाहणी केली यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या भागातील पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कोणत्या कायम स्वरुपी उपाय योजना करता येतील यावर चर्चा सुरू असुन बंगळूर पुणे महामार्गावर पुराचे पणी साचल्याने पाच दिवस वाहतूक बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे आता या भागातील पूर नियंत्रण रेषेच्या वर फ्लाय ओव्हर बांधण्याची मागणी आम्ही केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच पूरग्रस्त भागात लवकरच पंचनामे पूर्ण केले जातील आणि या भागातील जनतेला महिनाभर पुरेल इतके मोफत रेशन दिले जाईल असेही सांगितले दरम्यान सायंकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुराठीतीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली तिला अजितदादा,थोरात,वडेट्टीवार,सतेज पाटील,उदय सामंत आदी मंत्री हजार होते सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आज कॅबिनेटच्या बैठकीनंतर मदत जाहीर केली जाईल.
बॉक्स/ दौर्याचे राजकारण सुरू
पूरग्रस्त भागात पाहणी करण्याच्या निमित्ताने जे दौरे केले जात आहेत त्या दौर्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो म्हणून आता कुणी म्हणाले होते पण त्यावरून आता राजकारण तापले असून आम्ही दौरे केले नाही तर प्रशासकीय यंत्रणा वेगाने काम करणार नाही त्याच बरोबर तिथल्या जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या विरोधी पक्ष नेता म्हणून अधिवेशनात मांडण्यासाठी र्वेीीश करावेच लागणार असा पलटवार फडणवीस यांनी केलाय तर राज ठाकरे यांनीही पवारांच्या त्या विधानाला विरोध करताना परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तिथे पोचावेच लागणार असे म्हटले संजय राऊत यांनी तर विरोधकांना आता पर्यटन बंद करा असा सल्ला दिलाय त्यामुळे नेत्यांच्या दौर्याचे आता चांगलेच राजकारण तापले आहे