दौर्याचे राजकारण सुरू
पूरग्रस्त भागात पाहणी करण्याच्या निमित्ताने जे दौरे केले जात आहेत त्या दौर्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो म्हणून आता कुणी म्हणाले होते पण त्यावरून आता राजकारण तापले असून आम्ही दौरे केले नाही तर प्रशासकीय यंत्रणा वेगाने काम करणार नाही त्याच बरोबर तिथल्या जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या विरोधी पक्ष नेता म्हणून अधिवेशनात मांडण्यासाठी दौरे करावेच लागणार असा पलटवार फडणवीस यांनी केलाय तर राज ठाकरे यांनीही पवारांच्या त्या विधानाला विरोध करताना परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तिथे पोचावेच लागणार असे म्हटले संजय राऊत यांनी तर विरोधकांना आता पर्यटन बंद करा असा सल्ला दिलाय त्यामुळे नेत्यांच्या दौर्याचे आता चांगलेच राजकारण