ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

मोदी शहांच्या गुजरात मध्ये दारूबंदीची एशी तैशी-विषारी दारू पिवून 31 जणांचा मृत्यू

अहमदाबाद/ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दारूबंदी साठी आपली हयात वेचलि पण तरीही गुजरात मध्ये दारूबंदी कायद्याची अमलबजावणी होऊ शकली नाही आणि आता तर भाजपच्या राज्यात दारू माफियना मोकळे रान मिळाले आहे .त्यामुळेच गुजरात मध्ये एक भयंकर दारुकांड घडले आणि त्यात 31 जणांचा मृत्यू झाला तर 40 जन रुग्णालयात असून त्यातील काहीं लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे
गुजरातच्या बोटाद जिल्ह्यातील रोजीड गावात रविवारी काही लोक गावठी दारू प्यायली होते . त्यानंतर त्यांना वांत्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला.त्यामुळे या सर्वांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान 31 जणांचा मृत्यू झाला तर 40 जणांवर उपचार सुरू असून त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे या घटनेमुळे गुजरात मध्ये मोठी खळबळ माजली त्यानंतर पोलिसांनी 5 दारू माफियांना अटक करण्यात आल्याचे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी सांगितले दरम्यान काँग्रेस नेते अमित चवडा यांनी सांगितले की राज्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री केली जाते पण सत्ताधारी भाजप सरकारचा या दारू माफियांना छुपा पाठिंबा असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही .
गुजरात मध्ये 1960 पासून दारूबंदी कायदा आहे या कायद्या नुसार अवैध दारू विकणाऱ्या 10 वर्षांचा कारावास आणि 5 लाखांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे तरीही दारूचा व्यवसाय तेजीत आहे .

error: Content is protected !!