पालिका मुख्यालयात लोढांचे दालन वाद चिघळणार
मुंबई – उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पालिका मुख्यालयातील दालनात सद्या भाजपा नगरसेवकांची वर्दळ वाढू लागली आहे. इतर पक्षांची कार्यालये सील केली असताना माजी भाजपाचे नगरसेवक पालकमंत्र्यांच्या दालनात बसू लागल्याने नव्या वादावा तोंड फुटले आहे. हा वाद चिघळण्याची शक्यता आह
मंत्री लोढा यांनी गेल्या शुक्रवारी पालिका मुख्यालयातील दालनाचे उद्घाटन केले. पालिकेतील राजकीय पक्षांची कार्यालये सील केली आहे. त्यानंतर माजी नगरसेवक कार्यालयाबाहेर ठेवलेल्या बाकांवर बसू लागले. तेथे गर्दी वाढल्याने ती बाकेही काढण्यात आली. त्यामुळे माजी नगरसेवक पालिकेत येणे बंद झाले आहे.
प्रशासकीय काही काम असेल तर संबंधित अधिका-यांकडे जावून काम करून नगरसेवक मोकऴे होतात. माजी नगरसेवक पालिका मुख्यालयात थांबत नव्हते.
पालक मंत्र्याचे दालन उघडे झाल्यामुळे भाजपाचे माजी नगरसेवक आता खुलेआम बसू लागले आहे. इतर पक्षाच्या नगरसेवकांना बंदी आहे. पालिकेतील सर्वात असलेला शिवसेनेत (ठाकरे गट) यामुळे संतापाची भावना आहे. त्यामुळे दालनाचा विषय चिघळण्याची शक्यता आहे
पालिकेतील कार्यालय मंत्र्यांनी बऴकावले आहे. तेथे जनतेची कामे होणार नाही. तर भाजपाचे कार्यालय म्हणूनच ते वापरले जात आहे, हे खपवून घेतले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी महापौर किशोऱी पेडणेकर यांनी दिली आहे