ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

गणेशोत्सवासाठी पालिकेची एक खिडकी योजना

मुंबई – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा दिला आहे. मु्ंबई महानगरपालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सोवासाठी गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतूनऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई महानगरातील गणेशोत्सव मंडळांसाठी १ ऑगस्ट २०२३ पासून ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे गणेश मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस व मुंबई अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीसाठी वेगळे अर्ज करण्याची गरज नाही.
विविध उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने आयोजित केले जावेत आणि याबाबतची परवानगी प्रक्रिया अधिकाधिक सुटसुटीत व्हावे, या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार, तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. याच अंतर्गत गणेशोत्सवासाठी श्री गणेश मंडळांच्या मंडप परवानगीची प्रक्रिया अधिक सुटसुटीत व्हावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘एक खिडकी’ योजना येत्या 1 ऑगस्ट पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती उप आयुक्त (परिमंडळ – 2) रमाकांत बिरादार यांनी दिली.
गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १ ऑगस्ट २०२३पासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

error: Content is protected !!