ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमहाराष्ट्र

कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुवर्णा पत्की रुजु.

पोलिस निरींक्षक सुजाता तानवडे नंतर पुन्हा महीला अधिकारीची वर्णी!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलिस ठाणेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक अरुण भोर यांची बदली झाल्याने कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुजाता पत्की या रुजु झाल्या आहेत. दरम्यान कर्जत पोलिस ठाणेत पोलिस निरीक्षक सौ. सुजाता तानवडे यांच्यानंतर पुन्हा एकदा महीला अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे.
रायगड जिल्हयाचे पोलिस अधिक्षक श्री अशोक दुधे यांचा नियुक्ती नंतर रायगडात सुरक्षा आणि शांतता प्रस्तापित आहे. त्यानंतर जिल्हयात आता अनेक पोलिस अधिकाऱ्यांचा बदल्या झाल्या असल्याने कर्जतचे पोलिस निरीक्षक श्री. अरुण भोर यांचा कार्यकाल येथे संपल्याने त्यांचा जागी पोलिस निरींक्षक सौ. सुवर्णा पत्की यांची नियुकंती झाली असुन त्या कर्जत पोलिस ठाणेत हजर झाल्या आहेत. यावेळी त्यांचे स्वागत करणेसाठी अनेक राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी नवीन पोलिस निरीक्षक सौ. पत्की यांना भेटुन शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान या पुर्वी कर्जत पोलिस ठाणेत पोलिस निरीक्षक सौ. सुजाता तानवडे तसेच पोलिस निरीक्षक श्री. अरुण भोर यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम वाखाण्याजोगे केले असुन त्याचप्रमाणे नवीन हजर झालेल्या पोलिस निरीक्षक सौ. सुवर्णा पत्की या काम करतील असा विश्वास कर्जतकरांना असल्याचे सांगणेत येत आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा कर्जत पोलिस ठाणेत महीला पोलिस निरीक्षक सौ. सुवर्णा पत्कींचा रुपात हजर झाल्याने येथे महीला वर्गातही आनंदाचे वातवरण आहे. कर्जत पोलिस ठाणेत पुन्हा एकदा डॅशिंग महीला पोलिस निरीक्षका हजर झाल्याने कर्जत तालुक्यांत गुन्हे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आसल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!