ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

काँग्रेसला लागलेली घरघर आणखी वाढणार- गुलाम नबी काँग्रेस मधून आझाद

दिल्ली/ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नवी आझाद यांनी काँग्रेसला कायमचा बायबाय करीत चांगलाच हात दाखवला आहे.आझाद हे काँग्रेस मधून खऱ्या अर्थाने आझाद झाले आहेत आता ते जम्मू काश्मीर मध्ये नवा पक्ष स्थापन करणार आहेत त्यांच्या सोबत काँग्रेसच्या 6 माजी आमदारांनी राजीनामा दिला आहे, दरम्यान आझाद यांच्या पाठोपाठ आणखी काही काँग्रेस नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते
गुलाम नबी आझाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते तसेच ते राज्यसभेतील काँग्रेसचे गट नेतेही होते. मात्र पक्ष नेतृत्वाशी त्यांचे गेल्या काही काळापासून मतभेद सुरू होते खास करून राहुल गांधी यांच्याशी त्यांचे पटत नव्हते. काँग्रेसच्या ज्या 24 नेत्यांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती त्यात आझाद हे सुधा होते अखेर त्यांनी आज पक्षाच्या सर्व पदांसह सदस्य पदाचाही राजीनामा दिला त्यांच्या सोबत पक्षाचे जम्मू काश्मीर मधील माजी आमदार जी एम सारुरी,हजी अब्दुल रशीद,गुलजार अहमद वानी,मोहंमद भट,चोधरी, अक्रम,आणि आर एम चीब यांचा समावेश आहे त्यामुळे काँग्रेस मधील ही फूट पक्षाच्या मुळावरच येणार आहे तसेच आणखी काही नेते पक्ष सोडणार आहेत.

error: Content is protected !!