ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

दहीहंडीला गालबोट ६५ हुन अधिक गोविंदा जखमी


मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात गोपाळकाला साजरा करण्यात आला. मुंबईत वेगवेगळ्या भागात हंडी फोडताना ६५ हुन अधिक गोविंदा जखमी झालेत
मुंबईत दहीहंडी उत्सवाचा उत्साह दिसून येत असताना दुसरीकडे थरावरून कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाल्याने सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ६५ हुन अधिक गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. यापैकी गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 32 जणांवर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. तर, २३ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. ही आकडेवारी मुंबई महापालिकेने दिली असून रात्री ६ वाजेपर्यंतची आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जखमी गोविंदांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर, ठाण्यात संध्याकाळी ५ पर्यंत गोविंदा जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज दमदार हजेरी लावल्याने गोविंदा पथकांचा उत्साह आणखीच शिगेला पोहचला. चाळीतील गल्लींपासून ते राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या लाखोंच्या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काही ठिकाणी आठ थर तर काही ठिकाणी ९ थर रचण्यात आले आहे. संध्याकाळी ७. ३० वाजेपर्यंत कोणत्याही गोविंदा पथकाला १० थर लावता आले नाही. ठाण्यात ‘जय जवान’ गोविंदा पथकाने प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले.
यंदा लावणी क्वीन गौतमी पाटीलचा मुंबईतही जळवा बघायला मिळाला बोरिवलीतीळ शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या गोविंदा मध्ये गौतमीने भन्नाट लावण्या सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले इतरही ठिकाणी वेगवेगळ्या कालावांटणी प्रेक्षकांची माने जिंकली मुख्यमंत्री शिंदे , उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक दहीहंडी उत्सवात हजेरी लावली

error: Content is protected !!