ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिका

मग पालिकेने इलेक्ट्रिक वाहने घेतलीच कशाला -आणि कोणाच्या फायद्यासाठी

मुंबई – मुंबईला प्रदूषणमुक्त करण्याच्या पालिकेच्या घोषणा फक्त कागदावरच आहेत . प्रत्यक्षात मात्र मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत .मात्र एखाद्याच्या फायद्यसाठी प्रदूषण हटवण्यासाठी काहीतरी करतोय असा देखावा मात्र केला जातो त्याचे एक जीवंत उदाहरण समोर आले आहे . पालिकेने प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पाच इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली . पण एकीकडे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करायची आणि दुसरीकडे पेट्रोल डीझेलवर उधळपट्टी करायची हे पालिकेचे काहीसे विचित्र धोरण म्हणावे लागेल .पालिकेच्या ताब्यात सध्या 966 वाहने आहेत त्यात पेट्रोल डिझेल आणि सी एन जी वर चालणार्‍या वाहनांचा समावेश आहे .आणि याच ताफ्यात 5 इलेक्ट्रिकल वाहनांचा समावेश करण्यात आला त्यातील एक वाहन महापौरांच्या ताफ्यात आहे टाटा नेकसोन इव्ही एक्स्जेड्प्लसया मॉडलच्या पाच ही कार या क्ंद्रच्या अखत्यारीतील एनर्जी एफिश्येंसी सर्व्हिसेस य कंपनिकडून ड्रायलीज पद्धतीने खरेदी करण्यात आल्या आहेत .मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी यापुढे अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर भर दिला जाणार असल्याचे पालिका प्रशासन सांगते . मग पेट्रोल डिझेल च्या वाहन खरेदीवर उधळपट्टी का?

error: Content is protected !!