दादर चौपाटी विसर्जनाच्या कार्यात ही कंत्राटदाराने पालिकेला चुना लावत- जीवरक्षकांच्या ताफ्याचे आर्थिक शोषण व विम्याचा भुलभुलैया ?–खळबळजनक
मुंबई – पालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार इतरवेळी वेगवेगळ्या कामात मुंबईकरणा कसं चुना लवित असतात ते सर्वांना ठाऊक आहे पण गणेश विसर्जनासही चौपाट्यांवर जे जीवरक्षक ठेवले जातात त्यातील काहींना व्यवस्थित पोहताही येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार गणेशभक्तांच्या प्रणाशी खेळ करणारा आहे अशी संतप्त प्रतीक्रिया गणेश भक्तांनी व्यक्त केली असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर करवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गणेशोत्सवात दीड दिवसांचे, पाच दिवसांचे, सात दिवसांचे आणि अकरा दिवसांचे असे गणपती विसर्जन होत असते त्यासाठी ज्या प्रभागाच्या हद्दीत समुद्र चौपट्या येतात तेथे जीवरक्षक ठेवले जातात. यावेळी जी नॉर्थ म्हणजेच दादरच्या किर्ति कॉलेज पासून माहीम पर्यन्त विसर्जनासाठी अंदाजे 30 जीवरक्षक आणि बोटी ठेवण्यात आले होते. त्यांना प्रत्येकी 500 रुपये दिले गेले मात्र सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना जी आवश्यक साधने द्यायला हवी होती. ते जेकेट आदी बाबी दिलेली नव्हत्या. केवळ भगवे टी शर्ट देण्यात आले होते आणि सर्वात धक्कादायक म्हणजे यातील बरेचसे जीवरक्षक प्रशिक्षित नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी जर कुणी बुडाले तर त्यांना हे जीवरक्षक कसे वाचवणार होते.(वर्सोवा थेते 3 जण बुडाले ) कारण विसर्जनाच्या वेळी मानसे बुडण्याच्या अनेक घटना घडतात आणि त्या रोखण्यासाठी तर जीवरक्षक असतात तर जीवरक्षक विमाबाबत भूलभुलैया असल्याचे कळते.
महेश नावच्या एका व्यक्तीकडे जीवरक्षक पुरवण्याचे कंत्राट-
यावेळी महेश नावच्या एका व्यक्तीकडे जीवरक्षक पुरवण्याचे कंत्राट होते त्याने जीवरक्षकांना पैसे तर कमी दिले पण अशा काही लोकांची भरती केली ज्यांना समुद्रात पोहण्याचा अनुभव किंवा प्रशिक्षण नाही त्यामुळे जर एखादी दुर्घटना घडली असती तर जीवरक्षकच प्रशिक्षित नसल्याने किती मोठी हानी झाली असती याचा विचार पालिकेने करावा. या प्रकरणी जो कंत्राटदार होता त्याची कसून चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुंबईकर जनतेने केली आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीने प्रभागातील जी-उत्तरचे सहायक अभिंयता (पर्यावरण) मदने यांना फोनवर संपर्क करून माहीती विचारीली असता त्यांनी गडरे अभिंयताकडे पाठविले, त्यांनी टेडर संबधित जीवरक्षकांना न्याय देण्याच्या ऐवजी कंत्राटदाराचे प्रश्न मांडू लागले. त्यानंतर याबाबत प्रभागसमिती अध्यश्र टी. जगदीश यांची भेट घेतली असता संबधित अभिंयताकडून माहीती घेऊन संबधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले तर प्रभागाचे सहायक आयुक्त किरण दिंघावकर याच्या हाताखाली चाललेला सावळागोंधळ कारभाराबाबत जनतेत आश्चर्य व्यक्त केले जातेय.
जीवरक्षकांचे शोषण कोण थांबविणार ?
चार दिवसाच्या कार्यकाळात जीवरक्षकांना, सपूर्ण विर्सजण काळात चार वेळा,आठ तासाच्या कार्यकाळाचा अंदाजे 750 जीवरक्षक पुरविण्याचा कंत्राट, अंदाजे 9 लाख रूपयाचे काढण्यात आल्याची माहीती अधिकार्यानी दिली. परतु एका जीवरक्षकांला किती मोबदला दयावा, विंमा अट आणि सुरक्षा साधने या बाबत ठोस माहीती देण्यास नकार दिला. यामुळेच कदाचित जीवरक्षकांचे शोषण वर्षानुवर्ष चालू आहे ते अधिकार्याच्या संगनमताने पुढे चालू राहणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.