इडीची चौकशी सुरू होताच अडसुळांची प्रकृती बिघडली रुग्णालयात दाखल
मुंबई/ शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी सिटी को. ऑप बँक घोटाळ्या प्रकरणी ई डी कडून चौकशी सुरु होताच त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना गोरेगावच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे
अपक्ष आमदार रवी राणा यांच्या तक्रारीवरून अडसूळ यांच्या घरी आणि कार्यालयावर काल इडी ने छापा टाकला सिटी को. ओप.बँकेत ९०० कोटींचा घोटाळा केल्याचा आनंदराव अडसूळ व त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांच्यावर आरोप आहे या प्रकरणी आर्थिक गुन्हा शाखे पासून राष्ट्रपती पर्यंत तक्रारी करण्यात आल्या होत्या त्यावरून ही कारवाई ईडी ने केली . आज साडेआठ वाजताच ई डी चे अधिकारी अडसुलांच्या घरी पोचले त्यानंतर त्यांची ५ तास चौकशी झाली पण याच दरम्यान त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गोरेगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .