ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
विश्लेषण

कोरोनाचे वास्तववादी भाष्य करणारे ‘मळभ कोरोना’चे वाचनीय पुस्तक ; आशुतोष कुंभकोणी ; माजी आरोग्य मंत्र्यांच्या अनुभवातून झालेली निर्मिती

मुंबई, दि. (प्रतिनिधी) :-गेली दीड वर्षे भारतासह जग कोरोनाशी लढा देत आहे.मात्र याबद्दल अचूक व अभ्यासपूर्ण माहिती असणाऱ्या लेखांचा संग्रह असणारे लेखक व माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी लिहिलेले कोरोनाचे वास्तववादी भाष्य करणारे मळम कोरोनाचे पुस्तक आहे अश्या शब्दात राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी गौवोद्गार काढले.विलेपार्ले पूर्व येथील उत्कर्ष मंडळ हॉल मध्ये कोरोनाचे नियम पाळत त्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी मंचकावर प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे संपादक विनायक पात्रुडकर तर विशेष अतिथी म्हणून माजी खासदार व जेष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत तर डॉ.दीपक सावंत, इंकिंग इनोव्हेशन प्रकाशनाचे आनंद लिमये यावेळी उपस्थित होते.

आशुतोष कुंभकोणी म्हणाले की,कोरोना महामारी बद्धल वाचक जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतांना कोरोनाचा उगम,फैलाव याची अचूक माहिती या पुस्तकात आहे. समाजात जागरूकता,सजक्ता विषद करणारे आणि मुद्देसूद असलेले हे अभ्यासपूर्ण,वाचनीय पुस्तक आहे.तसेच अमेरिका,लंडन,व्हिएतनाम आणि इतर देशात कोरोनाची परिस्थिती काय आहे यावर त्यांनी या पुस्तकात भाष्य केले आहे.कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे आणि ते करतांना कोणते प्रयोग फसले आहे यावर या पुस्तकात माहिती आहे.एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता व पेशाने डॉक्टर असल्याने त्यांनी अचूक लिखाण या पुस्तकात केले असून विविध भाषेत या पुस्तकाचा अनुवाद झाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

१८९७ चा साथीच्या रोगाच्या कायद्याचा सरकारचा महाअधिवक्ता म्हणून आपल्याला खूप फायदा झाला आणि कोरोना बद्धल या कायद्याचा आधार घेत सरकारला योग्य मार्गदर्शन करता आले.खाजगी हॉस्पिटलमध्ये ठराविक दर ठरवण्यात न्यायालयापुढे सरकारची बाजू योग्यपणे मांडता आली.या कायद्यात बदल करा अशी सूचना डॉ.दीपक सावंत यांनी केलेल्या सूचनेचा आपण विचार करू असे त्यांनी सांगितले.

लोकमतचे संपादक विनायक पात्रुडकर म्हणाले की,कोरोनाचा दीड वर्षांचा काळ आणि आठवणी खूप कटू होत्या.सोशल मीडियावर कोरोना बद्धल अनेक माहिती येत असतांना लेखक डॉ.दीपक सावंत यांनी जगभरातून योग्य माहिती घेऊन समान्य माणसाला समजेल असे अचूक लिखाण करून विश्वासहर्ता या पुस्तकात विषद केली आहे.आरोग्यावर अभ्यासंपूर्ण लिखाण करणारे डॉ.दीपक सावंत असून त्यांच्या लिखाणातून आरोग्यदायी महाराष्ट्र घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माजी खासदार व जेष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत म्हणाले की,रोचक,रुचकर आणि वाचक असे हे अत्यंत संग्राह्य पुस्तक असून कोरोनाच्या महामारीवर कोरोनावरचे क्रमिक पुस्तक आहे. सुंदर लेखांकृती त्यांनी साकारली असून आजच्या पिढीला हे पुस्तक म्हणजे ठेवा आहे. विविध भाषेत भाषांतर करून या पुस्तकांच्या आवृत्या डॉ.दीपक सावंत यांनी काढल्या पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले.

या पुस्तकात लेखक डॉ.दीपक सावंत यांनी कोरोनाचा प्रवास या पुस्तकात रेखाटला असून मुंबई व महाराष्ट्रात कोरोना कसा आटोक्यात आला या विषयी त्यांनी यांनी भाष्य केले आहे. आपल्या प्रास्ताविक भाषणात ते म्हणाले की,१९८१ पासून आजपर्यंत आलेल्या साथीच्या रोगात काम केले. कोरोना नियंत्रणात आणण्यात सरकारला मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे युती सरकारच्या काळात साडेचार वर्षे आरोग्य मंत्री म्हणून काम केले आणि आजही मुख्यमंत्र्यां बरोबर काम करण्याची इच्छा आहे. कोरोना नियंत्रणात आला तरीही आज ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा धोका आहे. सुमारे 3 लाख व्हायरस पृथ्वीवर आहेत.मात्र आपण अजून कंबर कसली नाही.१८९७ चा साथीच्या रोगाचा कायदा कालबाह्य झाला.पंजाब सरकारने हा कायदा बदलला तो बदलला पाहिजे.आपल्या कडे अँटी स्पिटिंग कायदा नाही, तो अंमलात आणला पाहिजे. कोरोनाची त्रिसूत्री पाळली नाही तर तिसरी लाट येणार असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे सध्याची कोविड सेंटर बंद करू नका असे सूतोवाच त्यांनी केले. इंकिंग इनोव्हेशन प्रकाशनाचे आनंद लिमये यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

यावेळी डॉक्टर मंडळी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व पार्लेकर उपस्थित होते. आभारप्रदर्शन डॉ.स्वप्नेश सावंत यांनी केले तर प्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

error: Content is protected !!