सर्व भाजप विरोधी पक्ष शेतकरी संघटनांच्या पाठीशी भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
मुंबई/ केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान युनियन आणि अन्य शेतकरी संघटनांनी एकत्र येवून पुकारलेल्या भारत बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला .सर्व भाजप विरोधी पक्षांची ताकत शेतकऱ्यांच्या पाठीशी असतानाही या भारत बंदचां फारसा परिणाम जाणवला नाही . बंदला देशाच्या विविध राज्यांमध्ये समिष्र प्रतिसाद मिळाला .
सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सर्व शेतकरी संघटना एकवटल्या आहेत या सर्वांनी २७ सप्टेंबर रोजी भारत बंद ची हाक दिली होती त्यानुसार काल भारत बंद मध्ये शेतकरी कामगार आणि व्यापारीही सामील झाले होते पंजाब हरयाणा दिल्ली येथे शेतकऱ्यांनी रेल रोको तसेच रस्ता रोकोही केले त्यामुळे दिल्ली गाझीयाबाद हायवे जाम झाला होता . उत्तर प्रदेशच्या काही भागात बंदला मोठा प्रतिसाद मिळाला शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चात हजारो लोक सामील झाले होते तर अन्य शहरांमध्ये समिश्र प्रतिसाद होता मात्र ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला हरयाणा पंजाब आणि राजस्थान मध्येही चांगला प्रतिसाद मिळाला पण मध्य प्रदेश आसाम आणि इतर पूर्वोत्तर राज्यांमध्ये सामिष्र प्रतिसाद मिळाला दाक्षिणात्य राज्यात कर्नाटक मध्ये भारत बांधला सामिश्र प्रतिसाद मिळाला पण केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश तेलंगणात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा कडून भाजप विरूद्ध घोषणा दिल्या .महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भारत बंदला मोठा प्रतिसाद मिळाला शेतकऱ्यांच्या मोर्चाला काँग्रेस राष्ट्रवादी आणि काही ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते लातूर मध्ये प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तर उस्मानाबाद,सोलापूर कोल्हापूर,बीड येथे शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चे कडले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी तर रिक्षा चालवीत भाजप सरकारचा निषेध केला नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मोर्चात लोकही सामील झाले होते राजधानी मुंबई मध्ये काही भागात दुकाने बंद होती या भारत बंद मुले आता तरी मोदी सरकारचे डोळे उघडतील आणि शेतकरी विरोधी कायदे मागे घेतले जातील असे शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी म्हटले आहे