सावधान ! दांडियावर पोलिसांची नजर कडेकोट बंदोबस्तात नवरात्रोत्सव सुरू
मुंबई/ आजपासून देशभर कडेकोट बंदोबस्तात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.पी एफ आय सारख्या कट्टर पंथी संघटनेवर एन आय ने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान नवरात्रोत्सवात दांडिया रासच्या वेळेला मुलींची छेड छाड करण्याचे प्रकार घडतात ते रोखण्यासाठी सर्व दांडिया रास वर पोलिसांची करडी नजर असणार आहे
गणेशोत्सव ज्या प्रमाणे शांततेत पार पडला अगदी तसाच नवरात्रोत्सव सुधा शांततेत पार पडावा यासाठी सरकार,पोलीस प्रशासन आणि उत्सव मंडळ यांनी विविध उपाययोजना केलेल्या आहेत.उत्सव मंडळाच्या मंडपात कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी आयोजकांनी पोलिसांच्या मदतीने विविध उपाययोजना केलेल्या आहेत खास करून दांड्यावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांची खास पथके तैनात असून त्यात महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सुधा समावेश आहे .दांडिया मध्ये भाग घेणाऱ्या महिला मुली यांच्या सुरक्षेसाठी उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून खास धडे देण्यात आले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांच्या हद्दीतील मंडळाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठका घेऊन उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मंडपात देवीच्या दागिन्यांच्या चोरीचे प्रकार घडतात ते रोखण्यासाठी उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यां सुरक्षा पथके पोलिसांच्या मदतीला तैनात असतील शिवाय सीसीटिव्ही ची नजरही असेल खास करून ज्या ठिकाणी दांडिया रस असेल तिथे उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि सध्या वेशातील पोलीस तैनात असतील.