ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

शिवसेनेचे अस्तित्वच धोक्यात


दिल्ली/ महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची लढाई शिवसेनेसाठी आणखी कठीण झाली आहे.कारण सर्वोच्च न्यायालयाने काल निवडणूक आयोगाच्या कार्यवाही ला स्थगिती देण्याची शिवसेनेची मागणी फेटाळली त्यामुळे निवडणूक चिन्हं आणि पक्षाबाबत चां निर्णय आता निवडणूक आयोगा समोर होणार आहे त्यामुळे शिवसेनेचे भवितव्य आता निवडणूक आयोगाच्या हाती आहे.
शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा या शिवसेनेच्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती द्यावी हा विषय निवडणूक आयोगाकडे सोपवू नये अशी मागणी शिवसेनेने केली होती. मात्र न्यायालयाने शिवसेनेची मागणी फेटाळली आणि या बाबतचा निर्णय निवडणूक आयोगच घेईल असा निकाल दिला त्यामुळे आता खरी शिवसेना कोणाची याबाबत दोन्हीकडचे कागदपत्र तपासून निवडणूक आयोग निकाल देईल. त्यामुळे शिवसेनेचे भवितव्य निवडणूक आयोगाच्या हाती आहे .दरम्यान काल दिवसभर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली शिवसेनेकडून जेष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली तर शिंदे गटाकडून सिंग आणि महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली निवडणूक आयोगाच्या वकिलाने निवडणूक आयोगाची बाजू मांडली मात्र निवडणूक आयोग ही एक स्वयात संस्था असल्याने त्यांच्या कामकाजाला आम्ही स्थगिती देऊ शकत नाही असे सांगून 5 न्यायाधिशाच्या खंड पीठाने शिवसेनेची याचिका फेटाळली शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे .

error: Content is protected !!