ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

हाजी अल्ली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल

मुंबई :फेक कॉल करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे प्रकार आता वाढीस लागले आहेत . आणि आता तर धार्मिक द्वेषातून धार्मिक स्थळांना टार्गेट करू अशा प्रकारच्या धमक्या देणे सुरु आहे. हाजी अल्ली दर्ग्यात बोंब ठेवल्याचा कॉल करण्यात आल्याने खळबळ माजली होती
हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात एक धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची माहिती देत तातडीने दर्गा खाली करण्यास सांगितले. दर्ग्यामध्ये बॉम्ब ठेवला असून बॉम्ब स्फोट केला जाईल. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा फोन हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयीन फोनवर आला होता. तसेच आरोपीने फोनवर स्वत:चं नाव पवन असे सांगत
या प्रकरणी हाजी अली दर्गाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ताडदेव पोलिस ठाण्यात फोन करणाऱ्या व्यक्ती विरोधात कलम ३५१ (2), ३ ५२ , ३५३ (2), ३५३ (3), भादवी २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिस अधिक तपास करत आहेत.
धमकी देणाऱ्या व्यक्तीने हा फोन का केला होता, त्याच्या मागे काय हेतू होता याचा तपास पोलिस करत आहेत. हा फोन करणारा व्यक्ती हा कुणीतरी मानसिक रुग्ण असू शकतो अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे

error: Content is protected !!