ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मनोरंजनमुंबई

देशप्रेमाच्या गप्पा मारणारे भाजपा सरकार ‘सरदार उधम’च्या ऑस्कर मुद्द्यावर गप्प का ?

सरदार उधम’ ऑस्कर यादीतून वगळणे स्वातंत्र्य लढ्याच्या जाज्वल्य इतिहासाचा अपमान!:

मुंबई, दि. २७ ऑक्टोबर २०२१ ‘सरदार उधम’ चित्रपटात ब्रिटिशांबद्दल द्वेष दाखवण्यात आला असल्याचे कारण देत ज्युरींनी हा चित्रपट ऑस्कर नामांकनातून वगळणे हा १३० कोटी भारतीयांचा अपमान आहे. सरदार उधमसिंह हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या जाज्वल्य इतिसाहातील एक सोनेरी अध्याय आहे. ब्रिटींशांबद्दलचा कळवळा दाखवून उधमसिंह यांच्या देशप्रेमाचा, त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचा हा अपमानच आहे. देशप्रेमाचे सतत उमाळे येणारे भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार या विषयावर गप्प का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

यासंदर्भात बोलताना लोंढे पुढे म्हणाले की, सरदार उधम चित्रपट हा फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्युरींनी वगळणे हे फक्त चित्रपटापुरते मर्यादित नसून तो समस्त भारतीय जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. हा चित्रपट जालियनवाला बाग घटनेवर आधारित आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका निधड्या छातीच्या नायकावर हा चित्रपट बनवलेला आहे. चित्रपटाची निमिर्तीमुल्ये, दर्जा यात तो कुठे कमी पडल्याचे कारण नाही फक्त इंग्रजांबद्दलचा द्वेष हे ज्युरींचे कारण अत्यंत हास्यास्पद आहे.

जालीयनवाला बागेत जनरल डायरने शेकडो निरपराध व निष्पाप लोकांवर गोळ्या घालून नरसंहार केला. जालीयनवाला बाग नरसंहार हा भारतीयांच्या मनातील भळभळती जखम आहे. हे घडवून आणणाऱ्या जनरल डायरला गोळ्या घालून उधमसिंह यांनी या घटनेचा बदला घेतला. भारताच्या स्वातंत्र्यांसाठी लढताना ब्रिटिश सत्तेने अनन्वीत छळ केले. जालीयनवाला बाग हे त्याचेच एक उदाहरण आहे. स्वातंत्र्यासाठी हसत हसत सर्वोच्च बलिदान देणाऱ्यांपैकी सरदार उधमसिंह हे एक आहेत. या चित्रटातून देशाभिमान जागृत होत असताना आजही ब्रिटिशांच्या अपमानाचे कारण पुढे केले जात असेल तर ते अत्यंत निषेधार्ह आहे. सरदार उधमसिंह जेलमध्ये असताना राम मोहम्मद सिंह आझाद असे नाम ठेवून सामाजिक एकतेचे प्रतिक बनले होते. या महान देशभक्ताची महती सांगणाऱ्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय सन्मानापासून रोखणे हे कोत्या मनोवृत्तीचे दर्शन असून देशप्रमाचे गोडवे गाणारा भाजपा यावर गप्प आहे हे मनाला वेदना देणारे व तेवढेच आश्चर्याचे वाटते, असे लोंढे म्हणाले.

error: Content is protected !!