पॅगा सेस हेरगिरी प्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समिती सर्वोच्च न्यायालयाचा- केंद्र सरकारला झटका
दिल्ली/ संपूर्ण भारतात गाजलेल्या पेगसेस हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षते खाली एक त्रिसदस्यीय समिती नेमली असून आता या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे केंद्र सरकारला हा फार मोठा झटका आहे
इस्राईलच्या पेगसेस स्वपअर वापर करून भारतातील विरोधी पक्ष नेते,उद्योगपती,पत्रकार आणि काही भाजप नेत्यांची सुधा हेरगिरी करण्यात आली होती .या प्रकरण संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी मोठा गदारोळ घातला होता . पण सरकारने दाद दिली नाही अखेर हे प्रकरण न्यायालयात गेले तेंव्हा न्यायालयाने केंद्राला या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले पण गोपनीयतेच्या भंग होऊ शकतो असे कारण पुढे करून सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यास नकार दिला . त्यावर न्यायालयाने याचिका कर्त्याच्या याचिकेतील मुद्द्यांना ग्राह्य मानून या प्रकरणी निवृत्त न्यायधिश रविंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली असून त्यात दोन सायबर तज्ञ आहेत त्यामुळे आता या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे .केंद्र सरकारं साठी हा फार मोठा झटका आहे आता यातून जर काही महत्वाचे बाहेर आले तर केंद्र सरकारला मोठा धोका निर्माण होऊ शकतो .
बॉक्स/ हा सत्याचा विजय/ राहुल गांधी
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकाल नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलेली हा सत्याचा विजय आहे . अखेर न्यायालयाने आमच्याच भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आता दूध का दूध पणी का पाणी होईल कारण ३०० लोकांची फोन टॅपिंग झालीय तेंव्हा चौकशीत सरकारचाच पर्दाफाश होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला