ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सदावरतेच्या गाड्यांची तोडफोड करणाऱ्या तरुणांची जामिनावर सुटका !आक्रोश कायम


छत्रपती संभाजीनगर: मुंबईमध्ये गुणरत्न सदावर्ते यांची चारचाकी गाडीची तोडफोड करण्यात आली. यावेळी वाहनाची तोडफोड करणाऱ्या तरुणांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. गेल्या काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते मराठा समाजाच्या विरुद्ध वक्तव्य करत असल्यामुळे समाजामध्ये त्यांच्याबद्दल राग आहे. हाच राग काढण्यासाठी तरुणांनी सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली या प्रकरणी तिघांना अटक करून नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
मुंबईत गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या खाली उभे असलेली चारचाकी वाहन फोडणाऱ्या तरुणांमध्ये सर्वात पुढे असणारा तरुण छत्रपती संभाजीनगर शहरातील असल्याचे समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या गेवराई पायगाव येथील सरपंच मंगेश साबळे या तरुणाने तोडफोड केल्याचे समोर आले आहे. मंगेश साबळे हा गेवराई पायगाव येथील सरपंच आहे
मंगेश साबळे हे यापूर्वी त्यांच्या आक्रमक आंदोलनांमुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात तहसील कार्यालयासमोर तरुणाने चक्क दोन लाख रुपये उधळून लावले होते. अधिकारी विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा आरोप करत तरुणांनी दोन लाख रुपये शासकीय कार्यालयासमोर उधळले होते. हे पैसे उधळणारा देखील मंगेश साबळे होता. मंगेश साबळे यांनी विहिरींचे कामे दिले होती. मात्र, ती कामे पैसे दिल्याशिवाय होत नसल्यामुळे पैसे उधळण्याचा आरोप मंगेश साबळे यांनी केला होता.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आणि यामध्ये अनेक महिला व पुरुष जखमी झाले या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे मंगेश साबळे याने आपली नवीकोरी कार पेट्रोल टाकून जाळून टाकली होती.

error: Content is protected !!