माघार घेण्यास नवाब मालिकांचा नकार
मुंबई -भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात येत होता. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना तिकीट न देता त्यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून तिकीट देण्यात आलं. मात्र नवाब मलिक हे अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. नवाब मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभेमधून अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. नवाब मलिका यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. यावेळी छगन भुजबळ यांना या भेटीबाबत विचारले असता त्यांनी हात जोडल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिक यांच्यामध्ये बंददाराआड चर्चा झाली.मात्र माघार घेणार नसल्याचे मालिकांनी सांगितले