ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

राज्यपाल विरुद्ध सरकार मधील संघर्ष चिघळला

मुंबई/ विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे राजकारण आता भलतेच तापले असून सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर कायदेशीर चर्चा करायची असल्याचे कारण सांगून ताबडतोब सही करण्यास नकार दिला आहे .त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड आता लांबणीवर पडली आहे .राज्यपालांकडून महाविकास आघाडी सरकारला हा मोठा दणका आहे
विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊन अध्यक्ष निवडावा अशी सूचना दोन वेळा राज्यपालांनी केली होती पण त्याकडे सरकारने लक्ष दिले नाही आणि आता पाच दिवसांच्या हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याचा घाट घातला आहे आणि तेही नियमात बदल करून त्यामुळे राज्यपाल नाराज आहेत.रविवारी माहविकास आघाडीचे नेते राज्यपालांना भेटले होते आणि त्यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाचा तपशील आणि प्रस्ताव राज्यपाल दिला होता त्यावर कायदेशीर चर्चा करून कळवीन असे राज्यपालांनी सांगितले होते .पण आता मात्र राज्यपाल कायदेशीर बाबी जाणून यावर अभ्यास करायला वेळ लागेल असे सांगत असल्याने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या प्रस्तावावर राज्यपालांची सही होऊ शकली नाही त्यामुळे ही निवडणूक लांबणीवर पडणार आहे दरम्यान या मुद्द्यावर काल महाधिवक्ता आशुतोष कुंलकर्णी यांच्याशी सुधा चर्चा करण्यात आली तसेच राज्यपालांना आणखी एक विनंती पत्र पाठवण्यात आले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज अध्यक्ष पदाची निवडणूक होणे शक्य नाही आता ही निवडणूक मार्च मध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होईल मात्र तूर्तास राज्यपालांनी सरकारला मोठा दणका दिला आहे

error: Content is protected !!