ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

घोटाळ्यांच्या आरोप प्रत्यारोपाने अधिवेशनातील वातावरण तापले


नागपूर – सध्या नागपूर मध्ये सुरु असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वेगवेगळ्या घोटाळ्यांच्या आरोप प्रत्यारोपाने चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्र्यांवर झालेल्या नागपूर मधील जमीन खोटल्यानंतर आता कृषिमंत्री अब्दुल सत्तर यांच्या जमीन घोटाळ्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा अपेक्षेप्रमाणे वादळी सुरु झाला. कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन विदर्भातील नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात वातावरण तापलं . शिवाय कृषिमंत्री अब्दुल सत्तारांवरील यांच्यावरील आरोपानं तापलेल्या वातावरणात अजूनच भर पडली. अशा वेळी विरोधकांनी हल्लाबोल केला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र दिल्ली दौऱ्यावर होते.

कर्नाटकनं त्यांच्या विधानसभेत महाराष्ट्राविरोधी ठराव मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र सरकार काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज विरोधकांकडून तशी मागणीही जोरात केली गेली. यानंतर सीमावादासंदर्भात ठराव आणणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत सांगितलं. हा ठराव उद्या विधिमंडळात मंजूर केला जाईल.

आज नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर वीर बाल दिनाचा कार्यक्रम होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीला गेले. ही भेट व्यक्तिगत सदिच्छा भेट होती असं शिंदेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
लोकसभा अध्यक्षांना भेटून मुंबईला परतताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी वीर बाल दिनाच्या कार्यक्रमासाठी केंद्राच्या निमंत्रणावरुन दिल्लीला आलो होतो. मुख्यमंत्री म्हणाले की, सीमावादाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ठ आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत कायदा व सुवस्थेचा प्रश्न होऊ नये, याच्या सूचना केल्या आहेत. हा विषय 60 वर्षांपासूनचा आहे. असं असताना कोर्टातील प्रकरणावर परिणाम होऊ नये याची काळजी घ्यायला हव्या. जे आज बोलत आहेत त्यांनी सीमाभागातील लोकांच्या योजना बंद केल्या. टीका करणाऱ्यांनी माहिती घेऊन बोलावं. आम्ही पूर्णपणे सीमावासियांसाठी खंबीर आहोत. उद्या याबाबत आम्ही ठराव आणणार आहोत, असंही ते म्हणाले.

error: Content is protected !!