ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

थर्टी फर्स्टला बार मध्ये ४ पेगच दारू मिळणार बार मधील पार्ट्याना पहाटे ५ वाजे पर्यंत सशर्त परवानगी


मुंबई – डिसेंबर अखेर म्हणजे मद्यप्रेमींना चाहूल लागते ती ३१ डिसेंबरची. अनेकांना मद्य सेवन करत३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करत नवीन वर्षाचे स्वागत कारायचे असते. यासाठी आता ३१ डिसेंबरच्या रात्री पहाटे ५ पर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याच सोबत निर्बंध देखील लावण्यात आले आहेत. हॉटेल असोसिएशनने कुठलीही गडबड होऊ नये यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.
हॉटेल असोसिएशनने ग्राहकांना आता चार मोठे पेग दिल्यानंतर दारू न पिण्याचे आवाहन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पार्टी करून परत घरी जाताना कुठली गडबड अथवा अपघात होऊ नये याची खबरदारी घेण्यास मदत होईल. याच सोबत असोसिएशनने ग्राहकांना दारू देताना वयाची पडताळणी करण्यासाठी ओळखपत्र देखील तपासण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मद्यपान केलेल्या लोकांसाठी भाड्याने ड्रायव्हर देण्याची देखील योजना हॉटेल असोसिएशनने केली आहे.
हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे सचिव प्रदीप शेट्टी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 31 डिसेंबरच्या पार्टीच्या निर्णयाबाबत सर्व सदस्यांना कळवण्यात आले आहे. ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सर्व निर्णय घेण्यात आले आहेत. ग्राहकांना चार पेग प्यायल्यानंतर नशा चढल्याचे वाटल्यास सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना हॉटेल मालकांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान , अनेक हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलांना देखील दारू दिली जात असल्याचे प्रकरणे सुद्धा समोर येत असतात. त्यामुळे आता महाराष्ट्रातील तसेच मुंबईतील सर्वच हॉटेलमध्ये आता वयाची पडताळणी अनिवार्य केली आहे. यासाठी आता ग्राहकांना त्यांच्यासोबत ओळखपत्र सोबत ठेवणे देखील बंधनकारक आहे. अनेकदा अल्पवयीन मुले दारू पिऊन गाडी चालवतात आणि अपघात घडल्याचे अनेक प्रकरणे गेल्या काही महिन्यात आपण पाहिले आहेतच, त्यामुळे आता असोसिएशनने विशेष काळजी घेतली असल्याचे दिसत आहे.

error: Content is protected !!