मस्ती मे आ पियेजा…-महाराष्ट्र हे खऱ्या अर्थाने मद्यराष्ट्र परचिती होईल
दारूची नशा करी जीवनाची दशा हा वाक्प्रचार आता खूप झालाय आता दारूची नशा दाखवी जीवनाला दिशा असे यापुढे म्हणावे. लागेल कारण दारू कोणतीही असो वाइन असो की हातभट्टीची ती मानवी शरीराला फारशी हानिकारक नसल्यानेच दारूचे सर्वाधिक उत्पन्न आणि विक्री महाराष्ट्रात होते.दारू ही मराठी माणसाची ओळख बनलेली आहे. कारण दारू आणि महाराष्ट्रयंचे जिव्हाळ्याचे नाते आहे. अनेक विचारवंत आणि बुद्धिवादी लिव्हर खराब होऊन मेले तरी दारूची महती आणि उपयोगिता काही कमी झालेली नाही आणि होणारही नाही. इतका महाराष्ट्रावर दारूचा प्रभाव आहे.आणि याच प्रभावामुळे महाराष्ट्रातील महविकास आघाडी सरकारने एन करुणा चा संकट काळात वाइन बाबत एक महत्वाचा आणि सरकारच्या आर्थिक फायद्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र सरकारची आजची स्थिती खूप खराब आहे हे सर्वानाच ठाऊक आहे. महाराष्ट्रावर पाच लाख कोटींचे कर्ज आहे त्यातच गेली दीड वर्षांपासून कोरोनमुळे उद्योग धंदे मोठ्या प्रमाणावर बंद आहेत .परिणामी सरकारचे महसुली नुकसान होत आहे तर दुसरीकडे करुणा मुळे खर्च वाढलाय अशा विचित्र कात्रीत सरकार सापडलेले आहे आणि म्हणूनच सरकारने वाईन दुकानांमध्ये विकण्याची परवानगी दिली आणखी एक त्यामागे कारण आहे ते म्हणजे दारू दुकानाच्या लायसेन्स चां मोठ्या प्रमाणावर काळा बाजार सुरू होता.पॉलिटिकल कनेक्शन वापरून लायसेन्स मिळवायचे आणि ते दहा कोटी पासून २० कोटी पर्यंत विकायचे हा जी काही खेळ सुरू होता तो थांबवण्याची आवश्यकता होती .त्यामुळे आता वाईन सार्वजनिक करण्यात आली जर वायीन सुपर मार्केट किंवा सध्या किराणा मालाच्या दुकानात मिळायला लागली तर दारूच्या दुकानदाराच्या धंद्यावर परिणाम होऊ शकतो आणि दुकानात वाईन विकायची परवानगी देणे हा एक प्रयोग आहे. तो यशस्वी झाला की मग हळू हळू दुकानातून बीयर विकली जाईल आणि त्यानंतर व्हिस्की आणि इतर ब्रँड सुधा विकले जातील परिणामी दारूची दुकाने आणि त्यांच्या लायसेन्स चां धंदा पूर्णपणे बंद होईल परिणामी या धंद्यावर पोट भरणारे राजकीय दलाल भिकेला लागतील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हातात भिकेचा कटोरा येईल पोलिसवाले उपाशी मरतील कारण दारूच्या व्यवसायाशी सरकारी आणि राजकीय क्षेत्रातील अनेक लोक जोडलेले आहेत.त्यामुळे एका अर्थी सरकारचा हा निर्णय भ्रष्टाचाराला आळा घालण्या चां दृष्टीने काहीसा चांगला असला तरी समाजासाठी खूप घटक आहे .कारण वाईन हा जरी दारूचाच एक प्रकार असला तरी नशेच्या बाबतीत तो तितकासा परिणामकारक नाही म्हणूनच बायकाही वाईन चां शोकिन आहेत अशावेळी दुकानात जर वाईन मिळू लागली तर त्यांचे काम सोपे होईल आणि सहजपणे त्या या नशेच्या आहारी जातील.आणि घरात भांडणे वाढतील कारण मुलांच्या दृष्टीने आतापर्यंत बाबाच दारू पिऊन घरी धिंगाणा घालायचे. आता आई सुधा वाईन पीवून बाबांना तोडीस तोड उत्तर देऊ शकते आणि घरात तमाशाची डबल बारी सुरू होऊ शकते पण सरकारला त्याच्याशी घेणे देणे नाही.आणि लोकांचाही त्याला विरोध नाही उलट सरकारच्या या निर्णयाने तळीराम सुखावले आहेत .कारण आता घर बसल्या जारे बंटी दुकानातून वाईन घेऊन ये असे सांगता येईल आणि घर बसल्या वाईन मिळेल मायबाप सरकारने आता जनतेवर आणखी एक उपकार करावा शाळा कॉलेजच्या समोर चाहांच्या टपऱ्या ऐवजी वाईन चां टपऱ्या उघडव्यात म्हणजे पोराबलानही त्याचा आस्वाद घेता येईल आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगायचे झाल्यास दारूला लोकमान्यता मिळवून देणारा महापुरुष तळीराम याचे दारूवरील तदवज्ञान शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावे म्हणजे दारूचा प्रचार आणि प्रसार होईल त्यानंतर मग जब मिल बैठे चार यार..यासारख्या दारूच्या जाहिराती कराव्या लागणार नाहीत. छोटा बंटी सुधा घरबसल्या बाबांना दारूचे फायदे सांगू शकेल.महा विकास आघाडीच्या या निर्णयाने दारुबंदी साठी हयात वेचणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आत्म्याला निश्चितच यातना होत असतील तसेच बार बंद करणाऱ्या आर आर आबांच्या आत्म्याला सुधा शांती मिळणार नाही पण सरकारला भरपूर महसूल मिळेल आणि महाराष्ट्र हे खऱ्या अर्थाने मद्यराष्ट्र आहे याची संपूर्ण देशाला परचिती येईल.