ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सैनिकी शाळेतील मुलं आपल्या देशाचे भवितव्य -प्रवीण दरेकर

ससांगली- ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील रेठरे धरण, ता. वाळवा येथील एस.के. सैनिक इंटरनॅशनल स्कूल येथे भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. ही समोर बसलेली मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत. या सर्वांचे दर्शन घेण्यासाठी मी इथे आलो आहे, असे कौतुकास्पद उद्गार आमदार प्रविण दरेकर यांनी ध्वजारोहण कार्यक्रमात केले. यावेळी सैनिकी शाळेतील मुला-मुलींनी परेड, डान्स, देशभक्तीपर गाणी, योगा, कवायतीचे प्रकार उपस्थितांसमोर सादर केले.

यावेळी भाषण करताना दरेकर म्हणाले की, १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला. मात्र आपला देश कोणत्या कायद्यानुसार चालणार ती घटना, संविधान बनविण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाले. तेव्हा संविधान आपल्या देशाला मिळाले. त्या संविधानानुसार आपला देश चालत आहे. आपण स्वतंत्र झालो परंतु देश कसा चालणार हे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधानाने आपल्याला ठरवून दिले आहे. तो प्रजासत्ताक दिन आज संपूर्ण देशभर आपण एक उत्सव म्हणून साजरा करत आहोत, असे दरेकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, प्रजासत्ताक दिनी या सैनिकी शाळेत उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. तुमच्या सर्वांचे दर्शन घेण्यासाठी मी येथे आलो आहे. सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांसाठी राज्यभर काम करणारे नेते आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे ही भावना मनात घेऊन त्यांनी या सैनिकी स्कूलची स्थापना केली. स्कूल चालवणे ते पुढे घेऊन जाणे हे किती कठीण आहे हे जो संस्था चालवतो त्याला कळते. अशाप्रकारे संस्था चालवत त्यांना सैनिकी स्कूलला परवानगी मिळाली. देशात केवळ २७ ठिकाणी सैनिकी स्कूल आहेत. महाराष्ट्रात २ ठिकाणी सैनिकी स्कूलला मान्यता मिळाली आहे. त्यात सदाभाऊ यांचे सैनिकी स्कूल आहे. यातून त्यांचे काम व विश्वास दिसून येतो. आज आमचे नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. सैनिकी स्कूलला मान्यता मिळाली तेव्हा सदाभाऊ यांच्या मनात आनंद होता. सैनिकी स्कूलच्या माध्यमातून खेड्यातील मुलांना चांगले शिक्षण देऊ शकू ही त्यांची भावना आहे, असेही दरेकर म्हणाले.

दरेकर पुढे म्हणाले की, आज देशातील प्रत्येक राज्यातून मुले या सैनिकी स्कूलला आली आहेत. येथील मातीशी ते जोडले गेले आहेत. शिक्षण तर आपण सर्वचजण घेतो. ज्यांना पैसे कमवायचेत ते एमबीए, फायनान्स असे मोठमोठे कोर्स करतात. मात्र या देशाची सेवा करायची हा विचार करणारे लोकं कमी आहेत. त्यात सदाभाऊ आहेत आणि तुम्ही मुलं देशाचे भविष्य आहात. येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमांत, परेडवेळी मुलांमध्ये वेगळाच आत्मविश्वास दिसला. हा समोर बसला आहे तो आपला भविष्यातील भारत आहे. त्यांच्या मनात माझा देश सुरक्षित राहायला हवा ही भावना आहे. पैसा तर सगळेच कमवतील, नोकऱ्या चांगल्या मिळतील, टाटा-बिर्ला-अंबानी होतील. परंतु देशाची सीमा सुरक्षित राहिली नाही तर या सर्व गोष्टी काहीच कामाच्या नाहीत. त्यामुळे देशाची सुरक्षा करण्याचे पवित्र काम भविष्यात तुम्ही मुलं करणार आहात. सैनिक आणि तुमच्याप्रती मी मनापासून सेल्यूट करतो.

दरेकर पुढे म्हणाले की, देशाचे नशीब आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व लाभले आहे. देशाला दाखवलेले स्वप्न पूर्ण करण्याचे काम ते करताहेत.जागतिक स्तरावर आपल्या देशाचे नाव मोठे करण्याचे काम पंतप्रधान मोदी करताहेत. या आधी आपल्या देशावर शत्रू डोळे वर करून बघायचा. मात्र आता देशावर डोळे वर करून बघणाऱ्यांचे डोळे काढण्याची हिम्मत आपल्या सैन्यात आहे. ही हिम्मत पंतप्रधान मोदींनी दिली आहे. पुलवामात आपल्या सैनिकांवर दहशतवादी हल्ला झाला. मोदी गप्प बसले नाहीत. त्यांनी बालाकोटहुन थेट एअर स्ट्राईक केला आणि भारताचे सैन्य किती ताकदवान आहे हे संपूर्ण जगाला दाखवून दिले. आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर तसेच उत्तर देण्याचे सामर्थ्य आमच्या सैन्यात आहे, असा विश्वास मोदींच्या माध्यमातून या देशाने जगाला दिला. तुम्हा सर्व मुलांना प्रार्थना आहे की चांगले शिक्षण घ्या. केवळ एक सैनिक नाही तर सैन्यात ज्याज्या अधिकाऱ्यांची पदे आहेत ती तुम्हाला मिळवायची असल्याचेही दरेकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, या आधी सैन्यात मुलींना प्रवेश नव्हता. पंतप्रधान मोदींनी तोही खुला केला. सैनिकी स्कूलमध्ये आता मुलीही प्रवेश घेऊ शकतात. तुम्ही देशाचे भविष्य आहात. जे मार्गदर्शन लागेल ते देणार. सदाभाऊ खोत हे साधे कार्यकर्ते, प्रामाणिक शेतकरी नेते आहेत. त्यांनी माझ्याजवळ प्रस्ताव ठेवला. त्यांना सैनिकी स्कूलसाठी जेवढा पैसा लागेल तेवढा देण्याचे काम मुंबई जिल्हा बँकेने केले आहे. या स्कूलला डेव्हलप करण्यासाठी, विकासासाठी जेवढा पैसा लागेल तो माझी बँक सदाभाऊंना देणार, हे प्रजासत्ताक दिनी आश्वासन देतो असे सांगत जो चांगले काम करतो त्याला देवही समर्थन करतो. आम्ही केवळ निमित्त असल्याचे दरेकर म्हणाले.

फोटो ओळ

सैनिकी स्कूलमधील मुलांना मार्गदर्शन करताना आ. प्रविण दरेकर छायाचित्रात दिसत आहेत. याप्रसंगी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, विठ्ठल भोसले, सी. बी. पाटील, विक्रम पाटील, गौरव नाईक कवडे, सुनील खोत, सागर खोत, आयोजक शाळेच्या मुख्याध्यापिका भावना शिरोडकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


error: Content is protected !!