ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईविश्लेषण

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या नव्या इमारतीचा उद्घाटन व पायाभरणी सोहळा संपन्न

मुंबई/ स्व.वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या नव्या इमारीचे उद्घाटन आणि पायाभरणी सोहळा दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी मुंबईतील सायन येथे पार पडला. विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रविण दरेकर आणि महाराष्टॄ राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . या कार्यक्रमाला माजी आयएएस अधिकारी कुंभार,जस्टीज अनंत पोतदार, मा.अतिरिक्त आयुक्त विक्रमसिंह पाटणकर ,मा. नगरसेवक बळवंतराव पवार,संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार काटकर, सेक्रेटरी आप्पासाहेब देसाई यांच्यासह पालिका अभियंते डी.बी.पाटील, शहजाद पुरी,भुवन म्हात्रे, प्राचार्य-अशोक चव्हाण , आलम शेख, प्रवीण शितोंळे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व.वसंतदादा पाटील प्रतिष्ठान ही शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून 1990 साली या संस्थेने मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, कामगार नेते मामा फाळके, सहकार महर्षी भगवानदादा मोकाशी यांच्या प्रयत्नातून अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले तेंव्हा पासून या संस्थेची वाटचाल सुरू आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा ढवळे यांनी केले या कार्यक्रमाला शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरही उपस्थित होते.

स्व .वसंतदादा पाटलांच्या नावाचा डंका या मुंबई शहरातून पुन्हा एकदा याठिकाणीहून जगभर गेला पाहिजे -प्रविण दरेकर तडाखेबाज भाषण
-उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या माध्यमातून संस्थेला बळ मिळेल , आता आपण चिंता करू नका. तीस कोटी रुपये मुंबई बॅकेच्या माध्यमातून इमारत बांधण्यासाठी दिलेत . मुंबईतले एक सगळ्यात उत्तम कॉलेज झाले पाहिजे आणि स्व .वसंतदादा पाटलांच्या नावाचा डंका या मुंबई शहरातून पुन्हा एकदा त्या ठिकाणी जगभर गेला पाहिजे . कारण इथे येणारे विद्यार्थी हे जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी जाणार आहेत आणि म्हणून संस्थेच्या पाठीशी आम्ही उभे आहोत . लागेल ते सहकार्य कॉलेजला निश्‍चितपणे करू अशा प्रकारचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे. त्याचे कारण ज्या वसंतदादा पाटलांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेला जन्म दिला आणि निर्मिती केली . त्या वसंतदादा पाटलांमुळे आम्ही त्या बँकेमध्ये संचालक झालो . आज त्या बँकेचे नेतृत्व करतोय आणि या राज्यांमध्ये उत्तम प्रकारे बँक चालवत असताना नावलौकिक ज्या मुंबई जिल्हा बँकेने दिला .त्या बँकेची निर्मिती करणार्‍या वसंतदादा पाटलांनी जन्म घातलेल्या कॉलेजची अवस्था अत्यंत बिकट होती आणि मग हे कॉलेजेस टिकेल की नाही संस्थेचा काय होणार अशा प्रकारे परिस्थिती असताना त्या संस्थेला पुन्हा जिवंत करण्याचं काम उर्जेदार अवस्था देण्याचं काम आप्पासाहेब देसाई करताय आणि त्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली याबद्दल मी स्वतःला या ठिकाणी भाग्यवान समजतो .

जनरल सेक्रेटरी अप्पासाहेब देसाई यांनी भाषणात नव्या इमारतीमध्ये के.जी पासून पी.जे पर्यंतच्या शिक्षणाची आपण सोय करण्यात येणार असल्याचे सांगून त्यासाठी सगळ्यांच्या सहकार्य अपेक्षा आहेत. इमारत बांधकामाला प्रविण दरेकर यांनी आर्थिक निधी मंजूर केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!