ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर

मुंबई/ वरळी एस आर ए घोाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे . त्यामुळे भलेही त्यांना अटक झाली तरी 1 लाखांच्या जामिनावर त्यांची ताबडतोब सुटका होऊ शकते .
वरळीतील एस आर ए प्रकरणात बनावट कागपत्रांद्वारे पेडणेकर यांनी काही सदनिका आणि व्यावसायिक गाळे लाटल्या चा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता . त्यानंतर पालिकेने किशोरी पेडणेकर याना नोटीस बजावून त्यांची चौकशी केली होती .प्रकरणी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने त्यांनी अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती . तेथे त्यांना अटकपूर्व अंतरिम जमीन मंजूर झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे .

error: Content is protected !!