ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

मुंबई महापालिकेकडून काळया यादीतील दोन कंत्राटदारांना पुन्हा रस्त्याच्या कामांचे कंत्राट


मुंबई/ एखाद्या कंत्राटदारांनी चुकीचे काम केले तर पुन्हा आपण त्याला काम देत नाही मात्र मुंबई महापालिका त्याला अपवाद आहे कारण कंत्राटदारांनी कितीही निकृष्ट दर्जाचे काम केले आणि त्यात मुंबईकरांच्या घामाचा कितीही पैसा लुटला तरी पालिकेत सत्ताधारी,कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची जी युती आहे त्या युतीकडून ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारांना पुन्हा पुन्हा कामे दिली जातात आतहीआतही मुंबईच्या रस्त्यावर सेवा सुविधांचे जळे टाकण्यासाठी खोदण्यात येणाऱ्या चरी बुजवण्याचे कामात यापूर्वी घोटाळ्यांचा आरोप झाल्याने निविदा रद्द करण्यात आल्या होत्या मात्र आता त्यासाठी नव्याने निविदा मागवण्यात आल्या असून पुढील 3 वर्षांसाठी 383 कोटींचे कंत्राट दिले जाणार आहे मात्र त्यासाठी जी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यात पूर्वी काळया यादीत टाकण्यात आलेल्या महावीर कन्स्ट्रक्शन या कंत्राटदार कंपन्यांना भाग घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. काय तर म्हणे त्यांच्या शिक्षेचा कालावधी संपला .म्हणजे पालिकेतील भ्रष्टाचारी या काळया यादीतील कंपन्याच्या शिक्षेचा कालावधी संपण्याची वाट बघत होते. कारण या दोन कंपन्या बरोबर त्यांची आर्थिक सेटिंग आहे त्यामुळे या दोन कंपन्यांना काम दिले की मोठी आर्थिक क्तोडपणी होईल आणि मग त्यांनी पुन्हा निकृष्ट दर्जाचे काम केले तरी चालेल यशवंत जाधव यांच्यावर पडलेल्या धडीतून पालिकेतील सत्ताधारी आणि कंत्राटदार काहीच शिकले नाहीत असेच म्हणावे लागेल.

error: Content is protected !!