ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

वादग्रस्त जावईशोध

भारतात आजकाल वाचाळ वीरांची संख्या वाढत चालली आहे.उचलली जीभ लावली टाळ्याला.कुणाबद्दल काहीही बोलायचे आणि समाजात तणाव निर्माण करायचा असं सध्या सुरू आहे आणि सोशल मीडियाचा उदय जणू काही याच कामासाठी झालाय असे आता वाटू लागले आहे.तर काही लोकांना सभा ,व्याख्याने मेळावे यात नको ती वक्तव्य करून वाद निगेटिव्ह प्रसिद्धीची सुधा हाव असते.पण त्यामुळे समाजातील वातावरण खराब होते त्याचे काय? सध्या महानायक अमिताभ बच्चन यांच्या पेक्षाही महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले महामहीम राज्यपाल भगतसिंग कोशरी यांच्या विद्वतेची तुलना थेट चाणक्यशी केली जातेय.त्यांनी ज्या हुशारीने विधानपरिषदेसाठी निवडलेली 12 सदस्यांची यादी वर्षभर आपल्या मांडीखाली दाबून महा विकास आघाडीला चेकमेट दिलाय त्याची कशाशिही तुलना होऊ शकत नाही.असे महापुरुष महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून लाभले हे खरे तर महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेचे भाग्यच म्हणावे लागेल ! कोशारी साहेबांनी औरंगाबाद मधील एका कार्यक्रमात बोलताना रामदास स्वामी शिवाय शिवाजीला कोण विचारेल असे म्हटले होते.पण हा प्रकार म्हणजे कोषारी शिवाय महाराष्ट्रातील भाजप वाल्यांना कोण विचारेल अशातला आहे.कोषारी यांचा सर्वच विषयांवरील अभ्यास दांडगा आहे. म्हणून तर ते शरद पवारांच्या महाविकास आघाडीला पुरून उरले.असे असताना शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांनी केलेले विधान महाराष्ट्राने येवढं मनाला लावून घेण्याची आवश्यकता नाही .छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील प्रत्येक जाती धर्माच्या माणसाच्या हृदयात आहेत.त्यामुळेच काही लोक त्यांना फक्त हिंदुत्वाशी जोडण्याचा प्रयत्न करतात.पण महाराजांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आपल्या मायेच्या पंखाखाली घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले होते पण काही मनू वाद्यांना याच गोष्टीचा सल आहे. अशाच लोकांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता . पुढे याच लोकांनी शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लिहला.आणि शिवाजी महाराजांना फक्त गो ब्रहमन प्रतिपालक बनवले.पण महाराजांचे व्यक्तिमत्त्व आणि महान कार्य हे सर्वव्यापी होते. त्यांच्या या कार्यात प्रत्येक जाती धर्माच्या लोकांचा सहभाग होता मग शिवाजी महाराज फक्त गो ब्राह्मण प्रतिपालक होते असे कसे म्हणता येईल? मात्र ही कल्पना ज्या बामणी मेंदूतून आली त्यांनीच शिवाजी महाराजां पेक्षा रामदास स्वामींना श्रेष्ठ ठरवले.रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असे सांगितले जाते पण त्याबाबतचे कोणतेही पुरावे सापडलेले नसल्याने न्यायालयाने सुधा ही गोष्ट अमान्य केली.गुरू ही कल्पना कुणी अमान्य करीत नाही. आई वडील हे माणसाचे पाहिले गुरू असतात .छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांनी घडवले. त्यांच्यावर चांगले संस्कार केले आपल्या मातृभूमी विषयीची आपली जबाबदारी काय आहे . त्यासाठी कोणकोणत्या त्याग आणि दिव्य करावी लागतील हे जिजाऊनी शिवाजी महाराजांच्या मनावर बिंबवले त्यामुळे जिजाऊ याच महाराजांच्या खऱ्या गुरू आहेत .पण तत्कालीन मनुवादी समाज व्यवस्थेने जिजाऊ या केवळ महिला होत्या आणि महिलांना हिंदू धर्मात चूल आणि मूल यापूर्तच मर्यादित ठेवले जात असल्याने जिजाऊंच्या महान कर्तुत्वाला झाकून ठेवण्याचा काही मनुवादी इतिहासकारांनी प्रयत्न केला. पण त्यांना ते जमल नाही.कारण जिजाऊ या सूर्यप्रकाशा इतक्या दैदिप्यमान सत्य होत्या.तर मनू हा केवळ हिंदू धर्मावरील च नव्हे तर संपूर्ण मनवतेवरचा कलंक होता.शाहू फुले आंबेडकर यांच्या सारख्या समाज सुधारकांनी तो पुसून टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून तर आज महाराष्ट्रात समतेचे वारे वाहत आहे त्याला पुन्हा एकदा 500 वर्ष मागे नेण्याचा काही लोक प्रयत्न करीत आहेत आणि त्यासाठी गुरुशिष्य नात्याचे भावनिक भांडवल करीत आहेत त्यापासून लोकांनी सावध राहायला हवे.

महामहीम राज्यपालांनी इतिहासाच्या भानगडीत पडू नये कारण इतिहासातील महान व्यक्तिरेखांची समाजाशी भावनिक बांधिलकी असते .त्यामुळे शिवाजी महाराज,शाहू महाराज,महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी हिंदुत्वाला जोडून कोणतीही विधाने करू नयेत.रामदास स्वामी होते की नव्हते याविषयी इतिहासकारां मध्येही मत भिन्नता आहे.आणि जारी असेल तरी शिवाजी महाराजांच्या वरचा दर्जा त्यांना देता येणार नाही.कारण गुरू फक्त विद्या देतो पण त्याला कर्तुत्वाची जोड देऊन पुढे आयुष्य घडवण्यासाठी प्रयत्नांची पराका्ठा करावी लागते तेंव्हा कुठे माणूस घडतो त्यामुळे कर्तृत्ववान माणसाच्या यशाचे सगळे श्रेय गुरूला देता येत नाही.आणि तसे करताना गुरूचा मानही कमी होत नाही.त्यामुळे महामहीम राज्यपालांनी शिवाजी महाराजांविषयी भाष्य करताना सांभाळून बोलवे शिवशाहीचा सन्मान राखून बोलवे कारण शिवशाही म्हणजे महाविकास आघाडी नव्हे आणि शिवाजी महाराज म्हणजे काही उधव ठाकरे किंवा शरद पवार नाहीत याचे भान ठेवावे आणि आपली सगळी विद्वत्ता शिवशाहीच्या इतिहासावर पाजळण्या पेक्षा महाविकास आघाडीला जास्तीत जास्त खड्ड्यात कसे घालता येईल यावर खर्च करावी.

error: Content is protected !!