ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जरान्गेच्या आंदोलनाची एस आय टी चौकशीचे आदेश – फडणवीसांची माफी मागून जरांगे एक पावूल मागे

मुंबई : मराठा आक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंंभीर आरोप केले होते. एकेरी उल्लेख करत फडणवीसांना सागर बंगल्यावर येण्यार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरकारनेही कठोर भुमिका घेत जमावबंदीचे आदेश दिले. आज विधीमंडळ्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. त्यासोबतच जरांगे यांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा आहे. राजेश टोपे यांच्या कारखान्यामध्ये षडयंत्र रचलं गेल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला. या सर्व आरोपांवर माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
गरीब मराठा समाजाचं कल्याण व्हावं याच उद्देशाने हा लढा मनोज जरांगे यांनी सुरू केला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा पूर्व इतिहास पाहिला तर मागील अनेक वर्षांपासून शिबवा नावाच्या संघटनेसाठी अनेक वर्षे काम करत आहेत. मी जालनाचा पालकमंत्री असताना मनोज जरांगे यांनी 105 दिवसांचं सर्वात मोठं उपोषण केलं होतं. आमच्या हुतात्म पत्कारलेल्या मुलांना दहा लाख आणि नोकऱ्या देण्याचं मान्य केलं होतं, त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. पैसे कधी मिळणार याची विचारणा केली होती. यामध्ये काही साखळी तर आमरण उपोषण होतं. त्यावेळी मविआचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाण समितीचे अध्यक्ष होते तेव्हा यांची भेट घालून दिली होती. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांशीच बोलणार असल्याचं जरांगे म्हणाले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर मनोज जरांगेंना वेळ देत हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते. मला हेच सांगायचं आहे की जरांगे आताच नाहीतर आमचं सरकार असल्यापासून उपोषण करत असल्याचं
राजेश टोपे म्हणाले. माझ्या भागात एखाद आंदोलन सुरू असेल तर त्या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून माणुसकीच्या नात्याने मी पाण्याची किंवा नाष्ट्याची सोय केली होती. हे समाजबांधवा प्रती असलेलं प्रेम असतं. यातील महत्त्वाचा भाग असा की कोणत्याही मोर्चा वेळी किंवा आंदोलनावेळी आपण माणुसकी विसरायची नसते हे मला सांगायचं आहे, असं राजेश टोपी यांनी सांगितलं.

error: Content is protected !!