ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

डिसेंबर अखेर राज्यात दीड लाख नोकऱ्या- मुख्यमंत्र्यांची ग्वाही


मुंबई/ आश्वासने द्यायला पैसे लागत नाहीत आणि दिलेली आश्वासने पूर्ण करायला हवीत असाही काही नियम नाही.त्यामुळे राज्यकर्ते आश्वासनांची खैरात करीत आहेत .महाराष्ट्राच्या तिजोरीत भलेही छादम नसला तरी सरकारकडून आश्वासने देण्याचा सिलसिला काही थांबायला तयार नाही .शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून आश्र्वनांचा पावूस पडतो आहे.मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा केली जातेय आताही मुख्यमंत्री शिंदे यांनी डिसेंबर पर्यंत दीड लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.आता या दीड लाख नोकऱ्या साठी कोणते प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहेत हे त्यांचे त्यांना ठावूक निती आयोगाच्या बैठकीत शिंदेंनी कोकणातले वाया जाणारे पावसाचे पाणी मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आदी भागात वळवण्याचा सरकारच्या योजने साठी केंद्राकडे मोठी मदत मागितली असल्याचे समजते.

error: Content is protected !!