आज नव्या संसद भवनाचे उद्घाटन-बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांमध्ये फूट
दिल्ली/ आज राजधानी दिल्लीत नव्या संसद भवनाचे भव्य दिव्य असे उद्घाटन होणार आहे पंत प्रधान मोदींच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन होणार असून त्यासाठी देश विदेशातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत दरम्यान मोडीन ऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन करावे अशी विरोधकांनी मागणी केली होती पण ती फेटाळण्यात आली त्यामुळे काँग्रेससह 15 विरोधी पक्षांनी उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकला आहे पण बहिष्काराच्या मुद्द्यावरून आता विरोधकांमध्ये फूट पडली आहे कारण मायावती,चंद्राबाबू नायडू आणि अकलिडलाचे नेते संसद भवनाच्या उद्घाटनाला जाणार आहेत दरम्यान संसद भवन बांधताना कोणाला विचारात घेतले नाही आम्हाला पेपर मधून बातमी समजलो असे शरद पवारांनी म्हटले आहे