सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी नंतर शिंदेंच्या बंडखोर गटाला दिलासा- फैसला 12 जुलैला
मुंबई/ शिवसेनेतील असली नकली वादावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे तसेच तसेच नोटीस बजावल्या आमदारांवर 12 जुलै पर्यंत कारवाई करू नये असेही न्यायालयाने आदेश दिले आहेत
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या ज्या 16 आमदारांवर अपत्रतेची कारवाई करण्याची नोटीस बजावली होती . त्यांनी या नोटिशिला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते त्यावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली बंडखोरांच्या बाजूंनी हरीश साळवे आणि कौल यांनी युक्तिवाद केला तर शिवसेनेच्या बाजूने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला . यावेळी न्यायलयाने विचारले की डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात येण्याचे कारण काय त्यावर बंडखोरांच्या वकिलांना उत्तर देता आले नाही तर नरहरी झिरवळ यांनी विधिमंडळाच्या नियमानुसारच बंडखोरांना नोटीस बजावली आहे असे सिंघवी यांनी सांगितले त्यावर झिरवळ यांच्या विरोधात आम्ही अविश्वास ठराव दिलाय त्यामुळे ते आमच्यावर नोटीस बजाऊन बंडखोरांच्या वतीने सांगण्यात आले अखेर न्यायालयाने या प्रकरणातील सर्व पक्षकारांना नोटीस बजावून 11 तारखेपर्यंत प्रतिज्ञा पत्राद्वारे आपले म्हणणे मांडायला सांगितले आहे . त्यामुळे आमदारांचे निलंबन होणार की त्यांना वेगळा गट म्हणून मानता मिळणार याचा फैला 12 जुलै रोजी होईल .