ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

खाजगी वैद्यकीय चोरबजार

वैद्यकीय क्षेत्रात काम करून रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या डॉक्टरांना साक्षात ईश्वर मानले जाते पण आजकाल हा ईश्वर राजकारणी आणि चंबळ मधील डाकू पेक्षाही भयंकर लुटारू बनला आहे.आणि या क्षेत्रात मिळणारा अफाट पैसा पाहून मोठ्या संख्येने बोगस डॉक्टर लोकांनी आपली दुकाने थाटली आहेत त्यामुळे या बोगस डॉक्टरांकडून उपचार घेतलेल्या अनेकांवर पापले प्राण गमावण्याची पाळी आली आहे.मात्र जे खरे खुरे डॉकटर आहेत ज्यांनी एम बी बी एस,एम डी.यासारखी वैद्यकीय क्षेत्रातील मोठी पदवी घेतली आहे . ज्यांनी सरकारी रुग्णालयात सरकारने नेमून दिलेल्या काल मर्यादेपेक्षा ही अधिक काळ काम केले आहे त्यांनीही खाजगी दवाखाने आणि लॅब टाकून लूटमारीच्या क्षेत्रात आपणही मागे नाही हे दाखवून दिले आहे.सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या वैद्यकीय चवण्यासाठी जे बिल आकारले जाते त्यापेक्षा 15 ते 20 टक्के जास्त पैसे खाजगी रुग्णालये किंवा लॅब वाल्याने घेतले तर ते समजू शकते पण सरकारी रुग्णालयां पेक्षा 100 किंवा काही ठिकाणी200 टक्के पैसे उकळणे ही लुटमार नाही का ? सरकारी रुग्णालयात ई सी जी साठी 20 रुपये आकारले जातात त्यामुळे खाजगी रुग्णालये आणि लॅब मध ई सी जी साठी 50 किंवा 100 रुपये घेणे ठीक आहे पण तिथे i सी जी साठी 400 रुपये आकारले जातात. सोनो ग्राफी सरकारी रुग्णालयात 100 रुपयात होते त्यामुळे खाजगी रुग्णालयात 200 किंवा 300 रुपये घेतले तरी समजण्यासारखे आहे पण1200 आणि 1300 रुपये घेणे ही केवढी मोठी लूट आहे.एखादा हार्टचा पेशंट असेल तर त्याची एन्जीओ ग्राफि करण्यासाठी सरकारी रुग्णालयात जेमतेम 5 हजार खर्च येतो तर खाजगी रुग्णालयात 15 ते 20 हजार रुपये घेतले जातात ही केवढी मोठी लूटमार आहे . पण एखाद्या माणसाने 500 रुपयांची चोरी केली तर त्याला कुत्र्यासारखा चोप देणारे पोलीस डॉक्टरांकडून होत असलेल्या लूटमारीची साधी कंप्लेंट सुधा घेत नाहीत हा कुठला न्याय?

लॉक डाऊन क्या काळात या चोरांनी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना इतके लुटले की लोकांनी कर्ज काढून या चोरांचे खिसे भरले त्यावेळी अशीही चर्चा होती की करोना बावचित नसलेल्या पण क रोनाचा संशयाने रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून अफाट पैसा उकळून नंतर त्या पेशनटचा मृत्यू झाल्यावर त्याची बॉडीही दिली जात नव्हती .कारण त्या बॉडीच्या अवयवांचा सुधा व्यापार केला जात होता . पण याबाबत सरकारने खूप कमी लोकांवर कारवाई केली मात्र या व्यवसायातील लूटमार अजून थांबलेली नाही आणि कदाचित थांबणार सुधा नाही कारण सरकारला या जीवघेण्या प्रश्नात म्हणावा तितका इंटरेस्ट नाही लोक मरत आहेत मारुद्या सरकारच यात काहीच नुकसान नाही आणि म्हणूनच लोकांनी स्वतःहून यात लक्ष घालून पुढाकार घेऊन खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील या भयानक भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवायला हवा .

error: Content is protected !!